गोशाळा नक्षञ काव्यमैफल कान्हेवाडीत संपन्न

25

✒️प्रा.रावसाहेब राशिनकर(अहमदनगर,विशेष प्रतिनिधी)मो:-9404322931

अहमदनगर(दि.22सप्टेंबर):-नक्षञाचं देणं काव्यमंच,पुणे व सह्याद्री युथ फांऊडेशन,महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने युवाउद्योजक,गौरक्षक,समाजसेवक,काव्यप्रेमी मा.श्री.शंभूदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन हा उपक्रम घेण्यात आला.गोशाळा,आई,माता,गाई,भारतमाता या विषयांवरील कवितांचे बहारदार सादरीकरण करण्यात आले.

यामध्ये कवी वादळकार,पोलीस कवी विनायक विधाटे,कवी रामदास हिंगे,कवी बालाजी थोरात,कवी अरुण कांबळे या कविंनी कविता सादर करुन समाजप्रबोधन करण्यात आले. गोशाळा,कान्हेवाडी ता.खेड जि.पुणे येथिल गोशाळेत हा काव्यमैफलचा उपक्रम संपन्न झाला.यावेळी मास्क घालुन,विशिष्ट अंतर ठेवून या उपक्रमाचे सादरीकरण करुन मैफल रंगवली. यावेळी शंशूदादा म्हणाले,”आपल्याला दुस-याला देता येईल,तेवढे देत जावे.सामाजिक भान ठेवुन समाजात कार्य करावे.समाजउपयोगी कामात तरुणांनी सहभाग घ्यावा.गोमाताचे संरक्षण आपण केले पाहीजे.

“गोमाताचं संरक्षण व्हावे.यासाठी मोठी निवारा शेड बांधण्यात आली.त्यावेळी शेडचे उदघाटन ही करण्यात आले.या गोशाळेत दोनशे गौमातांचे संगोपन करण्यात येते.निसर्गरम्य परिसरातील गौशाळेतील काव्यमैफल आनंदी वातावरणात संपन्न झाली.कार्यक्रमाचे सूञसंचालन प्रा.राजेंद्र सोनवणे यांनी केले.आभार प्रदर्शन शंभूदादा पवार यांनी मानले.अडीच तास ही काव्यमैफल रंगली होती.