पत्रकार बांधवांसाठी आरोग्य शिबीर संपन्न

19

✒️प्रा.रावसाहेब राशिनकर(अहमदनगर,विशेष प्रतिनिधी)मो:-9404322931

अहमदनगर(दि.22सप्टेंबर):-दत्ता गायकवाड आरोग्य अभियान व रुही शैक्षणिक सामाजिक कलामंच , महाराष्ट्र पत्रकार संघ यांच्यावतीने पत्रकारांसाठी नुकतेच ऑनलाइन वेबिनार द्वारे आरोग्य शिबीर घेण्यात आले. राज्यभरातील अनेक पत्रकारांनी त्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी आरोग्य विषयक शंकांचे निरसन करण्यात आले.या वेबिनार मध्ये लठ्ठपणा, मधुमेह,रक्तदाब,सांधेदुखी,मान – कंबर – गुडघ्यांचे त्रास,पावलांचे दुखणे अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन केले गेले.

निरोगी राहण्याची कला कशी अवगत करावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे आयोजन श्री विलासराव कोळेकर यांनी केले होते.आरोग्य व्याख्याते दत्ता गायकवाड यांचे मार्गदर्शन ही पत्रकारांना एक पर्वणीच ठरली.
दत्ता गायकवाड व रुही शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या वतीने संपुर्ण राज्यभर आरोग्य संस्कार उपक्रम राबवला जात आहे.या उपक्रमा अंतर्गत पुढील विषयावर ऑनलाईन शिबिरे घेतली जात आहेत.

योगा – रोज करावयाची मुख्य आसने.प्राणायम व रिलेक्सेशन – स्वतःला तणावमुक्त करा. विद्यार्थ्यांची फिटनेस – उंची,पोस्चर,एकाग्रता,आहार व फिटनेस.लठ्ठपणा – दिनचर्या, आहार,पथ्य व सोपे व्यायाम.मानेचे त्रास – दुखण्याची कारणे,पथ्य,सोपे उपचार. कंबरदुखी – दुखण्याची कारणे,पथ्य व सोपे उपचार. गुडघेदुखी – दुखण्याची कारणे, पथ्य व सोपे उपचार. वार्धक्यातील समस्या बसने – उठणे,आहार, मनस्थिती. महिलांचे आरोग्य – मासिक पाळी-मेनोपॉज, संधिवात व इतर समस्या कामाच्या ठिकाणचे व्यायाम ऑफिस मधील सूक्ष्म व्यायाम,पोश्चर व इतर समस्या. शिक्षकांचे आरोग्य – दिनचर्या,झोप,आहार व शारीरिक समस्या.अशा प्रकारचे वेगवेगळे विषय घेऊन ते मार्गदर्शन करीत आहेत.

जवळपास दीड तास पत्रकार बांधवांच्या अनेक प्रश्नांना सविस्तर उत्तरे देवून श्री गायकवाड यांनी नियोजित ऑनलाईन सेमीनार यशस्वी केले.यावेळी सागर पाटील, रमेश बोभाटे,संजय गायकवाड, सुरेश पोटे,भगवान देवकर,विकास राठोड,नारायण घोडे,वसंतराव काटे,राजेंद्र खेत्री,सुभाष दळवी ,शिवाजी गोरे,प्रा.सुधीर पंचगल्ले,विलास कांबळे, प्रा.महेशकुमार मोटे आदी अनेक पत्रकार बांधवांनी अनेक आरोग्याबाबत माहिती घेतली.