लोणी येथे प्रहार शाखेचे गठन

    53

    ✒️वरुड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    वरुड(दि.22सप्टेंबर):- तालुक्यातील लोणी गावामध्ये प्रहार पक्ष प्रमुख बच्चूभाऊ कडू यांच्या विचारांना समोर करून वरुड-मोर्शी मतदारसंघात प्रहार नव्याने बांधणी करत असून आज दि-२१/०९/२०२० रोजी प्रहार युवा संघटना जिल्हाप्रमुख अमरावती मोहितभाऊ अढाऊ यांच्या नेतृत्वाखाली लोणी या गावी बैठक घेऊन प्रहार शाखेचे गठन करण्यात आले.त्यात प्रहार युवा संघटना शाखाध्यक्ष म्हणून संजयभाऊ पांडे व उपाध्यक्ष मयूर दाभाडे व सचिव हर्षल दाभाडे व त्यांच्या सोबत 10 पदाधिकार्यांनी प्रहार पक्षा मध्ये प्रवेश करून कामाला सुरुवात केली.

    तेव्हा प्रहार मोर्शी तालुक्का मीडिया प्रमुख हर्षल ओकटे, शाखा अध्यक्ष रिद्धपुर दिलीप साबळे, व यश लांडे यांच्या हस्तें अभिनंदन करण्यात आले.व लोणी येथील सर्व नवीन पदाधिकारी यांचे स्वागत करून समोरील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.