दिव्यांग व्यक्तीला स्वस्त धान्य दुकानाचे परवाने दया – समीर पटेल

35

🔸दिव्यांग विकास संघर्ष समितीची मागणी

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.22सप्टेंबर):-दिव्यांग व्यक्तीला स्वस्त धान्य दुकानाचा परवाना देण्यात यावे. या करीता दिव्यांग विकास संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष समीर पटेल यांनी तहसिलदारासह स्थानिक प्रशासन आणि राज्याचे मुख्यमंत्री व तसेच संबंधित सर्व विभागाचे मंत्री आणि राज्यमंत्री यांना ई मेल व्दारे निवेदन पाठवण्यात आले आहे.

दिव्यांग व्यक्तीसाठी केंद्र व राज्य शासनाने दिव्यांग कायदा २०१६ नुसार समान संधी, हक्कांचे संरक्षण आणि संपुर्ण सहभाग या मुख्य उद्देश असलेला दिव्यांग कायदा केंद्रात व राज्यात पास करण्यात आला आहे. व तसेच या कायद्यात दिव्यांगा करीता रोजगार, व्यसाय, नौकरी आणि शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक क्षेत्रात दिव्यांग व्यक्तीचा सर्वांगिण विकास व्हावा. या करीता शासनाने अनेक कायदे आणि शासन निर्णय वेळोवळी पारित करण्यात आले.

पण त्या कायद्याची व शासन निर्णयाची जिल्हा आणि तालुका स्तरावर काटेकोर पणे अंमलबजावणी होत नसल्याने दिव्यांग व्यक्तीला स्वंय रोजगारासाठी अनेक अडी अडचणीचा व कठिण संकटाचा सामना दररोज करावा लागत आहे.
शासनाने दिव्यांग व्यक्तीसाठी प्रत्येक क्षेत्रात राखिव आरक्षण ठेवण्यात आले आहे.आणि दिव्यांगाला गावातच रोजगार उपलब्ध व्हावा. या करीता अनेक वेगवेगळ्या योजना राबविल्या जात आहेत.

महाराष्ट्रतील प्रत्येक शहराच्या वार्डात आणि प्रत्येक गावात लोक संख्येत भरमसाठ प्रमाणात वाढ झाली आहे. परंतु त्या प्रमाणे शासनाने स्वस्त धान्य राशन दुकानाच्या परवाण्यात वाढ करण्यात आली नाही.आणि निलंबित झालेली राशन दुकाने हि एकाच राशन दुकानदाराला पर्यायी व्यवस्थेत जोडली गेली आहे. व तसेच एका स्वस्त धान्य दुकानात (ई पाॅज मशीन) मध्ये किमान ५०० ते ७०० राशन कार्ड जोडण्याची नियम व अटी आहे. परंतु प्रत्येक शहरात व अनेक गांवात एकाच स्वस्त दुकानात हजारो राशन कार्ड जोडली आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकट काळात प्रत्येक राशन दुकानात लोकांची भयंकर गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोना विषांणुचा प्रादुभाव झपाट्याने वाढत आहे. आणि काही ठिकाणी स्वस्त धान्य दुकानदार हे राशन धारकांना व वयोवृद्ध, निराधार आणि दिव्यांग व्यक्तीला अप शब्द भाषा आणि हिण वागणुक दिल्या जात आहे. भविष्यात लोकांची गर्दी कमी करण्यासाठी शहरातील प्रत्येक वार्डात आणि प्रत्येक गांवात एक एक राशन दुकाने दिव्यांग व्यक्तीला दिल्यास दिव्यांग व्यक्तीला आपल्या गावात रोजगार मिळेल. आणि काही प्रमाणातच का होईना दिव्यांग व्यक्तीला रोजगार उपलब्ध होईल.असे मत दिव्यांग विकास संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष समीर पटेल यांनी व्यक्त केले आहे.

त्यांच्या सोबत त्यावेळी जमीर पटेल, अजिंक्य अशोक चव्हाण, फारुख कुरैशी, प्रियंका पांडुरंग राठोड, अहेमद भाई, फहीमोद्दीन सरवरी, रमेश गोडबोले, शेख इम्रान, केशव वाठोरे, अ.खलिल खान,धुरपत सुर्यवंशी, सलमा शेख, अमोल नांदे, नजमा शेख, अंकुश कदम, सुलताना रतन कुरैशी, मारोती लांडगे, सुरज राठोड, आकाश सोनुले, कांचन वानखेडे यावेळी उपस्थित होते.