गुणी कन्येला स्वप्न साकार करण्यासाठी दानशूर व्यक्तींकडून रु. १ लाख १ हजार मदत

97

🔸प्रतिकूलतेवर मात; बारावीच्या परीक्षेत येवला तालुक्यात प्रथम

✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

नाशिक(दि.22सप्टेंबर):-येवला तालुक्यातील अदरंसुल येथील विद्यार्थीनीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत अंदरसूल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे ज्यू कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, अंदरसुल ची इ १२ वी वाणिज्य विभागात तालुक्यात प्रथम क्रमांकाने बोर्ड परीक्षेत प्रथम आलेल्या गुणी कन्येला दानशूर व्यक्तींकडून रु १ लाख १ हजार आर्थिक मदतीचा आधार देत तिचे CA होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी अनोखी भेट दिली.

तालुक्यातील अंदरसूल येथील अतिशय गरीब शेतमजूर कुटुंबातील कु.भाग्यश्री भाऊसाहेब देशमुख हिने प्रतिकूल परिस्थितीत इयत्ता बारावीत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला. भाग्यश्रीच्या या दैदीप्यमान यशाचे सर्व गावाला कौतुक वाटले. गावातील व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून भाग्यश्रीवर बक्षिसांचा वर्षाव सुरू झाला अन् ३५ दिवसात व्हॉट्सअप ग्रुपच्या व सोशल मिडीयाच्या माध्यमातून तब्बल ९० हजार रुपये मदत जमा झाली.

या रकमेत महात्मा फुले शिक्षण संस्था नाशिक चे अध्यक्ष व अंदरसूल शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस अॅड श्री सुभाषराव गोविंदराव सोनवणे यांनी ११ हजार रुपये मदत देवून एकूण १ लाख १ हजार रुपये झाली. हि सदर रक्कम अंदरसूल येथील अंदरसूल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण भांडगे, सरचिटणीस अॅड सुभाषराव सोनवणे संचालक मकरंद सोनवणे, राजेंद्र गायकवाड, अमोल सोनवणे, आदिंच्या हस्ते भाग्यश्री च्या घरी जाऊन देण्यात आली.

🔹भाग्यश्रीला मदत सुपूर्द

तालुक्यातील व्हॉट्सअप ग्रुप व सोशल मिडीयावर बारावीचा निकाल लागल्यानंतर भाग्यश्रीच्या कौतुकाची व परिस्थितीची पोस्ट पडली अन् एक भावनिक साद तयार झाली. ग्रुप सदस्य प्रा. मच्छिंद्र सोळसे यांनी सर्वप्रथम ५०१ रु बक्षीस जाहीर केले आणि बघता बघता ३५ दिवसात जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र व परदेशातून मदत जमा झाली. ही मदत १ लाख १ हजार रुपये जमा झाले. ग्रुपच्या माध्यमातून जमा झालेली ही रक्कम भाग्यश्रीच्या घरी जाऊन देण्यात आली.