✒️नवनाथ आडे(गेवराई,तालुका प्रतिनिधी)मो-9075913114

गेवराई(दि.22सप्टेंबर):-कांदा घेवून लातुरहून हैद्राबादला घेवून जाणारा ट्रक तालुक्यातील सावरगाव येथे थांबला असता पाठीमागुन आलेल्या भरधाव टेम्पोने ट्रकला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एक जण जागेवर ठार तर एकाचा जिल्हा रूग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या अपघातात अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी लातूर येथे हलवण्यात आले असल्याचे समजते. हा अपघात पहाटे साडेतीन वाजता मुंबई-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावरील सावरगाव येथे झाला.

लातूर येथून कांदा घेवून हैद्राबादला ट्रक क्रमांक के.ए.५६-३०५८ ने जात असतांना ट्रकच्या दोर्‍या ढिल्या झाल्याने त्यातले काही कांद्याचे पोते खाली पडले. त्यामुळे चालकाने ट्रक सावरगावजवळ साईडला घेवून खाली पडलेले पोते आतमध्ये टाकत असतांना पाठीमागून आलेला टेम्पो क्रमांक एम.एच.१६ ए.ई.६००८ ने ट्रकला जोराची धडक दिल्याने या भीषण अपघातात अन्वर मजलेसाहब बहादुरे (वय २८) हे जागेवरच ठार तर टेम्पोमधील गजानन मिरकुटे (वय ५२ वर्षे) हे गंीभर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केलेे. उपचार सुरू असतांना त्यांचाही मृत्यू झाला. तर अन्य दोन जण यात जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी हलवल्याचे समजते.

Breaking News, महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED