अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे सर्वे करा – जनार्दन पुरी

    50

    ✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587

    सेनगाव(दि.23सप्टेंबर):-काही दिवसांनी पासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन,कापूस,हळद,तुर या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे. सध्या तालुक्यात सर्वच भागात जवळपास सोयाबीन काढणीला आली आहे. परंतु अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाला नव्याने कोंब येत आहेत. तर काही भागात काढलेली सोयाबीन काळी पडली आहे.

    त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तरीही प्रशासनाने या पिकांचे सर्वे करावे अशी मागणी जगदंबा युवा ग्रुप महाराष्ट्र राज्य सेनगाव तालुका अध्यक्ष जनार्दन पुरी यांनी केली आहे.