हिंगोली जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकरी बांधवांना तात्काळ मदत द्या – आ. संतोषराव बांगर

8

✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी)मो:-8308862587

हिंगोली(दि.23सप्टेंबर):-मागील काही दिवसापासून हिंगोली जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन,कापूस,तूर यासह हळद,ऊस व केळी या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच जिल्ह्यात अजूनही मुसळधार पाऊस चालू असल्यामुळे सोयाबीन पिकाच्या उभ्या झाडांच्या शेंगाला कोंब फुटत आहेत.

सर्वच शेतात पाणीच पाणी झाल्यामुळे खरिपाची सर्वच पिके चिभडली आहेत. कयाधू व पैनगंगा नदीच्या व नाल्याच्या काठावरील सर्वच पिके पाण्याखाली गेली आहेत. अगोदरच सोयाबीनचे बियाणे खराब निघाल्या मुळे शेतकरी बांधवावर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. त्यात आता निसर्गाने तोंडचा घास हिसकावून घेतल्यामुळे शेतकरी बांधव मोठा हवालदिल झाला आहे.

त्यामुळे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील सर्वच सरसकट पंचनामे करून शेतकरी बांधवांना मदत मिळवून द्यावी अशी मागणी कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख संतोषराव बांगर यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रामध्ये केली आहे.