✒️कुशल रोहिरा(सातारा,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9763526231

सातारा(दि.23सप्टेंबर):-सज्जनगड परिसरात सज्जनगडाच्या पाठीमागील बाजूस आंबाले तळे डोंगरावर रविवार पासून काही युवकांना बिबट्याचे सदृश प्राणी दिसला काही वेळ नीट पाहणी केली असता तिथे बिबट्या असल्याचे निदर्शनास आले. गडावरील काही युवकांनी दगडावर बसलेल्या बिबट्याचे फोटो काढले.तसेच गडावरील एकाची शेळी खाल्ल्याचे ही समोर आले आहे.

या परिसरात यादववाडी, वाघवाडी, लोहारवाडी या गावातील बहुतांश गुरे ही याच भागात आसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी वनविभागाने तत्काळ योग्य ती काळजी घ्यावी अशी मागणी होत आहे.

गडावर भरती पूर्व प्रशिक्षणासाठी सरावासाठी भल्या पहाटे व सायंकाळी शेकडो युवक सरावासाठी येत असतात.पर्यटकही फिरायला येत असतात आणि. मॉर्निंग वॉक साठीही लोकांची वर्दळ असते. त्यामुळे वनविभागाने लक्ष देण्याची मागणी ही जोर धरू लागली आहे.

महाराष्ट्र

©️ALL RIGHT RESERVED