स्त्री अत्याचार विरुद्ध लढा,स्त्री मानसिक संघर्ष

27

सूरज बनाने के बाद भगवान के
पास जो रोशनी बची उसे बेटी
बनाकर हमारे घर भेज दिया ….!”
घर मे रोशनी का सागर यानी “बेटी

मानव हा या जमिनीवरील सर्वश्रेष्ठ आणि बुद्धिमान मानला जाणारा प्राणी होय. त्यांने आपल्या बुद्धीच्या जोरावर हे जागतिकरण केले आहे. पण आजकाल माणूस माणसातील माणुसकी विसरायला लागलेला आहे.
काही दिवसांपूर्वी ‘निर्भया अत्याचार’ झालेल्या घटनेमधील आरोपींना शिक्षा झाली त्या दिवशी मनाला खूप बरं वाटलं. अशा अनेक स्त्री अत्याचाराविरूद्ध च्या घटना आहेत. आज त्या घटनेतील आरोपींनासुद्धा शिक्षा मिळत आहे. उदाहरणार्थ 1973 मध्ये 26 वर्षे ‘अरुणा शानबाग’ ही एक नर्स होती तिच्यावर अत्याचार झालता. आज कोरोना सारख्या महामारी मध्ये आपण एका नर्सला देव मानतो पण, काही लाचार लोक त्यांच्यावरच अत्याचार करतात. 1990 मध्ये 14 वर्षे शाळकरी मुलगी ‘हेटल परेख’, 1995मध्ये खालच्या जमातीतील महिला ‘भनवारी देवी’, 1996मध्ये लाॅ स्टुडंट ‘प्रियदर्शनी’, डिसेंबर 2012 मध्ये बसमध्ये 23 वर्षीय महिला, अशा अनेक घटना ऐकल्यावर, वाचल्यावर मानवाची लाचारी, त्याची माणुसकी हरवल्यासारखे वाटते.

तसेच जुलै 2018 मध्ये बारा वर्षे मुलगी त्याच प्रकारे जानेवारी 2018 मध्ये आठ वर्षीय मुस्लिम लहान मुलीला ड्रग्ज्स देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. ह्या घटनाही मनाला अस्वस्थ करून टाकतात.
आज माणूस स्वतःच्या विकास करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करत आहे आणि त्याने तो केलाच पाहिजे. आपण अत्याचाराच्या अनेक घटना सभोवताली पण अनुभुवतो पण कमी हात मदतीला धावतात तर जास्तीत जास्त हात हे त्या घटनेचे मोबाईल मध्ये छायाचित्रित करतात. अशा अनेक प्रसंगांना आपण जिवंत साक्षीदार असतो पण आपण काहीच करू शकत नाही. कारण, ह्या घटनेची गोष्ट झाल्यावर आपल्याला खंत वाटते.
आजच्या आत्ताच्या आरोपींना शिक्षाही होते पण असे लाखो- हजारो घटना आहेत. त्या घटनांचे पूरावे प्
पसार करून आरोपी समाजामध्ये ताठ मानेने चालतात त्यांना खरतर छत्रपती शासन किंवा कठोर शासन व्हायलाच हवं.

अशीच एक घटना आहे …….
घटना आहे पंचवीस वर्षांपूर्वीची, मोठे कुटुंब असते, सुखाने नांदत असतं. या कुटुंबांमध्ये काही कारणामुळे एक नणंदेचा आणि तिच्या नवऱ्याचा समावेश होतो. मोठा परिवार असतो सुख – शांतता नांदत असते. ही घटना एका लहान मुलीच्या मानसिक आणि वैचारिक संघर्षाबाबत आहे.
त्या परिवारामध्ये अशीच एक सुंदर, प्रेमळ मुलगी असते. जवळपास ते दोन-तीन वर्षाची असते. अचानक त्या मुलीचे आई-वडील आपल्या मुलीला घरी ठेवून दुसर्‍या राज्यात एका कार्यक्रमाची उपस्थिती लावण्यासाठी जातात. ती मुलगी घरीच असते. तिला सर्व काही कळत नसते. अशा या कार्यक्रमाच्या काळात नणंदेचा नवरा त्या दोन – तीन वर्षीय मुलीसोबत लैंगिक संबंध ठेवतो. त्या लहान बिचारी मूलीला काय कळत नसते तिच्यासोबत घडत आहे पण, तिच्या ही घटना खूप वर्ष लक्षात राहते. खरचं ती लहान मुलगी खूप गोंडस, बोलकी आणि हुशार असते. ह्या सगळ्या गोष्टींना फक्त तीच स्वतः साक्षीदार असते. सर्व घटनेनंतर ती राखीव झाल्यासारखी वागते. ती तिच्या आवडी-निवडी कडे दुर्लक्ष करायला लागते. एकटंच राहणं पसंत करते. तिच्यामधील लहान वयामध्येच कुतूहल हे ऊमलायच्या आधीच सुकतं. तिचा बौध्दिक अंक लहान असल्यामुळे ती स्वतःच्या आईवडीलांनाही काही सांगत नाही.आणि सांगितलं तर काय सांगणार दोन – तीन वर्षाची मुलगी? तिला पोलीस चौकी साधी माहीत नसते. खऱ्या अर्थी तिनं विश्वच बघायचं अजून सुरुवात केलेली नसते. असेच अनेक वर्षे निघून जातात. नणंद आणि नणंदेचा नवराही त्यांच्या घराचे काम झाल्यावर त्या कुटुंबातून वेगळे होतात.

ती मुलगी डिप्लोमा करत असते. ती आता दिसायला सुंदर, तरुण असते. तिच्या घरी आता फक्त लग्नघाई चालू असते. तिच्या लग्नासाठी खूप नाती येतात. ती प्रत्येक नात्याला नकार देते. असच एकदा तिच्या आत्याच्या म्हणजे त्यांच्या घरी पंचवीस वर्षे अगोदर नणंद राहत होती ती, त्यांच्या मुलाला बघायला जातात. मुलगा तसा बराच असतो पण मुलीला मात्र पंचवीस वर्षाच्या गोष्ट मनाला लागत असते, त्यामुळे ती लग्नाला नकार देते. पण, घरच्या जबरदस्तीने त्या दोघांचं लग्न होतं. ती काहीच दिवस खूष राहते परंतू, नंतर तिच्या आयुष्यामध्ये बदल होतात. ती सासर्याला म्हणजे तिच्यावर पंचवीस वर्षांपूर्वी ज्याने अत्याचार केलेला असतो, त्याला थोडाही आदर देत नाही. तिची सासू पण दिवसेंदिवस वाईट वागत राहते, ती बारीक-सारीक गोष्टींमध्ये चुका शोधण्यातच व्यस्त असते.
मुलगी आता गरोदर होते पण अचानक ती एका पोटदुखीच्या आजारात पडते. जेव्हा ती गरोदरपणाच्या वेळी वैद्यांकडे जाते तेव्हा तिला वैद्य सांगतात की पोटात लहानपणापासून इन्फेक्शन तसेच गाठ आहे. आता ती अस्वस्थ होते, सतत विचारच करत राहते, रात्री झोपतही नाही, जेवणही करत नाही.

आता तिला सर्व काही समजत असतं, पोलिसातही जाऊ वाटतं पण पुरावा नसतो. ती ह्या मानसिक त्रासाला कंटाळलेली असते. हे सर्व फक्त पंचवीस वर्षांपूर्वी तिच्या दृष्ट सासर्यामुळेच झालेलं असते. ती आता काहीच करू शकत नसते. ती आता कंटाळून – कंटाळून धडा करून फक्त आपल्या आईला पंचवीस वर्षांपूर्वीची घटनेची जाणीव करून देते. आईच्या अंगावर शहारेच फुटतात. तिही संतापते. पण काय करणार समाजात हसू नको म्हणून आईपण तोंड बंद करते. तो मुलीच्या सासरा म्हणजे आईचा चुलतभाऊच असतो. अशा अस्वस्थ स्थितीत आई शांतच असते, समाज आणि माणसं काय म्हणतील म्हणून. मुलीचा राज दिवसेंदिवस वाढतच असतो. ती कुणालाच काहीच बोलत नाही. आता ती दोन – तीन वर्षाची बोलकी मुलगी 25 वर्षानंतर अबोली होते. कसं जगली असेल पंचवीस वर्षे? कशी डगमगत असेल मानसिक स्थिती? काय – काय विचार आले असतील जगताना? जेव्हा आपणही अशा काही गोष्टी वाचतो त्यावेळी आपलाही राग प्रचंड वाढतो. आपल्याला वाटते की आरोपीला शिक्षा व्हावी पण पुरावा मात्र नसतोच ना. तिचं जेव्हा लग्न होतं तेव्हा तिचं इंजिनीअरिंग पूर्ण झालेलं असत. कसं तिनं यशाचं शिखर गाठलं असेल? असे अनेक प्रश्न मनाला स्पर्श करून जातात. ती आता एका लहान बाळाला जन्म देते.

GOD SEND TO EARTH AN ANGEL
THE SWEETEST ANGEL TOO
AND FOR SUCH A TINY LITTLE THING
SHE HAD SO MUCH TO DO

खरोखरच आहे आपल्या बाळासाठी सर्वस्व असते. आता ती मुलगी आपल्या बाळाकडे सर्व लक्ष केंद्रित करते. आता ती तिच्या सासर्‍याला भावपण द्यायचा बंद करते. तिच्या सासूला आता हा तिचा स्वभाव आवडू लागत नाही त्यामुळे तिच्यावर ओरडतो. तिला आता तिच्या नवऱ्याकडून पण काही सहाय्य मिळत नव्हतं. त्यांच्यात दररोजच विवादच होतात. मुलगी ह्या सर्व गोष्टींना दुर्लक्ष करून तिच्या बाळाचे पालनपोषण करू लागते. ती तिचे प्रश्न स्वतःच्या आईवडिलांना पण सांगत नाही. कारण, त्यांनाही आपल्यामुळे कशाला त्रास.
एके दिवशी ती आणि तिचा अडीच वर्षाचा मुलगा माहेरी जातात. तिचं आता सासरी मन रमत नसतं. तिला भूतकालीन गोष्टीची आठवण यायची सासर्‍याला बघितल्यावर. पण आता तिचा काहीच बदलू शकत नव्हते. आता आई-वडिलांनाही चूक झाल्यासारखी वाटत होतं जर का तिने त्या अगोदर तिच्या आई-वडिलांना पटवून सांगीतले असते तर त्यांनी तिला लग्नासाठी जबरदस्ती केलीच नसते. तिचं आयुष्य खर्या आर्थी व्यर्थच झालेलं असतं. पण आता वेळ निघून गेलेली.

आता तर तिच्यासाठी दोन्हीही कुटुंब शत्रूच झालेले. आता तिच्यासाठी आपलंस कोणीच सहकार्य करणारे नव्हतं. आता पंचवीस वर्षांपूर्वीचा पुरावा पण शोधू शकत नव्हते, आणि दुसऱ्यांना, पोलीसचौकीत, न्यायालयात जरी सांगितले. पंचवीस वर्षांपूर्वी झालेली घटना त्या सर्वांसाठी फक्त गोष्टच राहील त्यामुळे ती कोणाकडे तक्रारच करत नाही. तिच्यासाठी शांत बसणेच योग्य आहे आता तिला जाणवायला लागलेलं.
जेव्हा ती परत सासरी माघारी जाते तेव्हा तिच्या नवऱ्याने दुसरे लग्न केलेलं असतं. सगळेच शांत असतात. सासरचे लोक तिच्या चुका आहेत म्हणून घराबाहेर काढतात. ती तिच्या रागाच्या भरात बाहेर निघून जाते. सर्वजण चिंतेत पडतात. आई-वडिलांनाही तिची काळजी वाटू लागते. ती 28 जानेवारी 2017 रोजी अकरा वाजता घर सोडलेलं असतं. आई-वडील रात्रंदिवस तिला शोधण्याचा प्रयत्न करतात काही दिवसानंतर ती सापडते, आई – वडील घरी घेऊन येतात पण सासरचे लोक तिचा मुलगा स्वतःजवळ ठेवत घेतात. आता त्या मुलीला सासरीही जाऊ वाटत नाही. इतकं शिकून काय फायदा झाला? आता ती स्वतः स्वतःच्या पायावर उभी राहण्याचा विचार करते. काही काळानंतर ती नोकरी करून स्वतःच्या पायावर उभी राहते. पण ही घटना त्या दोन – तीन वर्षाच्या मुलीला न न्याय मिळवून देताच संपुष्टात आली.

हि घटना पंचवीस वर्षांपूर्वीचा आहे. सांगण्याचा काय हेतू? कोणीचा विश्वास होणार नाही. आता फक्त देवच नाही मिळवून देऊ शकतो असं त्या मुलीला वाटतं. अशा अनेक घटना आपल्या शरीरावर काटे आणणार्या आहेत.
मुख्य कारण म्हणजे आपण आपल्या लहान मुलांना कोणाच्याही विश्वासावर त्यांच्याजवळ सोपवू नका आरोपी दोषी आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. लहान मुलांना एकटे सोडू नका. माणसाने माणुसकीचं नातं जपायला पाहिजे. आज स्त्री संरक्षणासाठी वेगवेगळे कार्यक्रम देशामध्ये आयोजित केले जातात. उदाहरणार्थ “बेटी पढाओ, बेटी बचाओ” सारखे कार्यक्रम मोठ्याप्रमाणात केले जात आहेत स्त्री संरक्षणासाठी.

जब-जब जन्म लेती है बेटी,
खुशियां साथ लाती है बेटी!
ईश्वर की सौगात हैं बेटी,
सुबह की पहली किरण है बेटी!”

माणवाने जीवनामध्ये स्रीचे महत्त्व जाणून स्री भ्रूण हत्या थांबवावी.

खरं आहे मुलगा जरी वंशाचा दिवा असला, तरी मुलगी ही त्या दिव्याची वात आहे.

——————————————————————–

✒️लेखक:-संग्राम संतोष सलगर
पत्ता = रा. चव्हाणवाडी पो. टेंभूर्णी ता. माढा जि. सोलापूर, महाराष्ट्र
● व्हाट्सऍप मोबाईल क्रमांक = 7756844169, 7517885979

▪️संकलन:-अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620