जगदंबा ग्रुप महाराष्ट्र राज्य तर्फे सेनगाव नगरपंचायतला निवेदन

133

✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587

सेनगाव(दि.23सप्टेंबर):- सेनगाव शहरात असलेला पशुवैद्यकीय उपकेंद्र येथे घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे तिथे पशुपालकांना व जनावरांना जाण्यासाठी त्रास होत आहे. पशुवैद्यकीय उपकेंद्र हे सर्व पाण्याखाली गेले असून तिथे पशुपालकांना व जनावरांना त्या पाण्यातून जावे लागत आहे.

 यासाठी लवकरच काही उपाययोजना कराव्यात अशी मागणी जगदंबा युवा ग्रुप महाराष्ट्र राज्य सेनगाव तालुकाध्यक्ष जनार्दन पुरी, उपाध्यक्ष गजानन गव्हाणे, रवी खंदारे, सर्जेराव खंदारे यांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांना केली आहे.