

🔸मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी
✒️आतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405
परळी(दि.23सप्टेंबर):- शहराला पाणीपुरवठा करणारे वान धरण हे ओव्हरफ्लो झाले आहे चार वर्षापूर्वी वान धरण ओव्हर फ्लो झाले होते परळी शहराला नगरपालिकेच्या वतीने दर पाच दिवसाला पाणीपुरवठा पाणीसाठा उपलब्ध नसल्यामुळे केला जात होता परंतु आता वान धरण ओव्हर फ्लो झाल्यामुळे परळी शहराला एक दिवसाआड करून पाणीपुरवठा करावा व परळी करांची तहान भागवावी अशी मागणी परळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे परळी मार्केट कमिटीचे उपसभापती प्रा. विजय मुंडे यांनी केली आहे. तसेच शेतीसाठी पाणी मिळणार असल्यामुळे बळीराजा आनंदित झाला आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ,वान प्रकल्पामध्ये पाणीसाठा हा आगामी काळासाठी आरक्षित सुद्धा राहिला पाहिजे जेणेकरून पिण्याच्या पाण्यासाठी परळी करांची गैरसोय होणार नाही याचीही काळजी प्रशासनाने घेणे गरजेचे आहे तसेच शेतकरी सुद्धा आनंदित झाला आहे कारण वान धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे शेतीसाठी सुद्धा पाणी मिळणार आहे.
परळीतील सामान्य माणूस हा सर्वस्वी नगरपालिकेच्या पाणीपुरवठा नळ योजनेवर अवलंबून आहे त्यामुळे त्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली होती परंतु वान धरण ओव्हर फ्लो झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणार आहे अशी आशा सुद्धा सामान्य नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. प्रत्येकच सामान्य माणसाकडे बोर अथवा विकत घेण्याची परिस्थिती नाही त्यामुळे या सर्व गोष्टीचा विचार करता प्रशासनाने एक दिवसाआड करून परळी शहराला पाणीपुरवठा करावा अशी मागणी निवेदनाद्वारे प्रा .विजय मुंडे यांनी केली आहे.