ब्रम्हपुरी तील लघु व्यवसाहिक व फेरीवाले संघाकडून सवलतीची मागणी

39

✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.23सप्टेंबर):- तालुक्यातील लघु व्यावसायिकानी मा. जिल्हाधिकारी साहेब यांना लघु व्यावासाहिक व फेरीवाले संघ यांच्या सवलत मागणीचे निवेदन देण्यात आले. ब्रम्हपूरी आदेशाने दिनांक २५ सप्टे ते 1 ऑक्टोबर दरम्यान जनता कर्फ्यू होत आहे. परंतु सदर शासन आदेश हे लघु व्यावसायिकाना अत्यंत क्लेषदायक व जीवघेणा ठरणार आहे. देशात लॉक डाऊन झाल्या पासून ते आज पर्यत छोटे व्यावसाय सुरळीत सुरु झाले नसूनही पुन्हा आता ८ दिवसाकरिता जनता कर्फ्यू लावल्याने व्यावसायिकाना उपासमारीची वेळ आलेली आहे.

जेमतेम आता कुठे व्यावसायिकाना पोट भरेल एवढेच उत्पन मिळत असताना पुन्हा शासनाने जनता कर्फ्यूची कुऱ्हाड उधारली असल्याने व्यावसायिकाच्या, दुकानाचे, गाळ्याचे किराया, वीजबिल व इतर खर्च तसेच घरातील लेकराबाळांना लागणारे जीवनाश्यक वस्तू व्यावसायिक कशी मिळवनार असा प्रश्न पुढे उभा राहिला आहे, सततच्या अशा वातावरणामुळे सर्वाची मानसिक अवस्था अत्यंत बिकट होऊन आत्महत्या शिवाय दुसरा मार्ग दिसेनासा झालेल्या आहे.

करिता सदर जनता कर्फ्यू दरम्यान लघु व्यावसायिकाना व फेरीवाल्यांना SOP देयून दुकाने चालू ठेवण्या करिता सवलत देण्यात यावी. सदर सवलत देण्यात येत नसेल तर आत्महत्या करण्याची परवानगी देण्यात व्यावी असे लघु व्यावसायिकानी केली आहे.

किंवा व्यावसायिकाच्या समस्या विचार करून आदेशित करण्यात यावे,अशी विनंती लघु व्यावसायिकानी केली आहे. निवेदन देताना,लघु व्यावासाहिक व फेरीवाले संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.