माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानांतर्गत सह्याद्री शिवराज्य सामाजिक संस्था व स्वराज्य प्रतिष्ठान संयुक्त विद्यमाने कोविंड योद्धा सन्मानपत्र प्रदान

    42

    ✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

    नाशिक(दि.23सप्टेंबर):- माझें कुटुंब माझी जबाबदारी याअंतर्गत निफाङ तालुक्यातील नारायणगाव (खेरवाङी) येथे सह्याद्री शिवराज्य सामाजिक संस्था व स्वराज्यं प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कोवीङ योद्धा सन्मान पञ प्रदान खेरवाङी येथे जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब शिरसागर जिल्हा परिषद सदस्य दीपक शिरसाट पंचायत समिती सदस्य रत्नाताई संगमनेरे तलाठी शशिकांत चितळकर ग्रामसेवक दहिफळे प्रशासकीय अधिकारी महाजन साहेब आरोग्यसेवक डॉक्टर चौधरी व ग्रामस्थ यांनी करून काळात आपले कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या अलकाताई संगमनेरे यांना प्रथम श्रद्धांजली वाहिली व कोरोना व्हायरस ला कसा पायबंद घालता येईल याचे मार्गदर्शन केले व आपल्या कुटुंबाची आपण कशी जबाबदारी घ्यायची याविषयी मार्गदर्शन केले.

    डॉक्टर चौधरी यांनी जनतेस न घाबरता सहकार्याचे आवाहन केले तलाठी शशिकांत चितळकर यांनी केले या वेळी मान्यवर जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब शिरसागर यांनी शासनाच्या आदेशाचे पालन करण्यास सांगितले विनाकारण फिरू नये प्रवास करू नये गर्दीच्या ठिकाणी थांबू नये गर्दी करू नये मास्क चा वापर करावा असे आवाहन करण्यात आले.

    यावेळी त्यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना सांगितले व त्यांच्या हस्ते अशा सेविका अंगणवाडी सेविका व पत्रकार विजय केदारे, राजेंद्र आहिरे यांचा कोविंड. सन्मान् पञ देवुन सन्मानित करण्यात आले यावेळी माजी सरपंच आरडी आवारे माजी सरपंच सोपान संगमनेरे माजी उपसरपंच दशरथ संगमनेरे सतिष संगमनेरे शंकर संगमनेरे आ दि सह ग्रामस्थ उपस्थित होते.स्वराज्य प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब आवारे याच्यां सहकार्याने सदर नियोजित कार्यक्रम यशस्वी झाला आहे.