🔸कोरोना विषयक आढावा बैठक

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.23सप्टेंबर):- एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आल्यास काय करू व काय नको असा संभ्रम रुग्णाच्या मनात निर्माण होत असतो यासाठी रुग्णाला होम आयसोलेशन संदर्भात योग्य ती माहिती देण्यासाठी वेगळा हेल्पलाइन नंबर कार्यान्वित करा अशा सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आरोग्य विभागाला दिल्यात.

यावेळी, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, मनपा आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एन. मोरे उपस्थित होते.

दैनंदिन बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता व रुग्णालयातील बेडची उपलब्ध संख्या पाहता संपर्कातून एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्यास त्या व्यक्तीला होम आयसोलेशनचा पर्याय देण्यासाठी तसेच इतर काही मदत हवी असल्यास दोन हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करावे असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले.

मोठे घर किंवा राहण्याची स्वतंत्र व्यवस्था असेल तर सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांस होम आयसोलेशन मध्ये राहता येईल, त्यासोबतच बाधित व्यक्तीने स्वतःच्या कुटुंबातील काळजीवाहू व्यक्ती नेमल्यास रुग्णाची योग्य ती काळजी घेणे, औषध सुविधा पुरविणे, व रुग्णाची वेळोवेळी मॉनिटरिंग करणे शक्य होईल. असेही ते यावेळी म्हणाले.

14 दिवस व 10 दिवसाआधी खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या रुग्णाचा डिस्चार्ज झाला किंवा नाही, त्याठिकाणी करण्यात आलेल्या व्यवस्था व स्वच्छता याविषयी माहिती जाणून घ्यावी. होम आयसोलेशन करणाऱ्या रुग्णाची माहिती मिळावी यासाठी होम आयसोलेशन ॲप तयार करण्यात येणार आहे.जिल्ह्यात होम आयसोलेशन, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग यावर भर देण्यात येत असून यासाठी मनुष्यबळ वाढविण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्यात.

चंद्रपूर, महाराष्ट्र, विदर्भ, स्वास्थ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED