अतिवृष्टीमुळे सवाई सक्रू राठोड यांचा चार एकर सोयाबीन पिकाचे नुकसान

17

✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587

सेनगाव(दि.23सप्टेंबर):-गेल्या अनेक दिवसापासून हिंगोली जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होत असल्यामुळे अनेक पिकांचे नुकसान झालेले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील उमरखोजा या गावांमध्ये सवाई सक्रू राठोड यांचे नुकसान झाले आहे.

त्यांचे मूळ गाव हे भटसावंगी असून त्यांचे चार एकर सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारकडून पंचनामा सुद्धा झालेला नाही तसेच कर्मचारी सुद्धा पाहणी करिता शेतात आलेला नाही. प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी सवाई सक्रू राठोड यांनी केली आहे.