ब्रम्हपुरी तालुक्यात जनता कर्फ्युला उत्तम प्रतिसाद 

28

✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दी.25सप्टेंबर):-आज पासून सुरु झालेल्या जनता कर्फ्युला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. जनता कोरोना विषाणु रूग्‍णांची संख्‍या वाढलेली असल्‍याने रूग्‍णांची साखळी तोडण्‍याकरीता जिल्‍हयातील व्‍यापारी संघटना, सामाजिक संघटना, व सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी तर्फे दिनांक 25/09/2020 ते 01/10/2020 पर्यत , सात दिवसांचा जनता कर्फ्यु पाडण्‍याचे ठरविलेले आहे.

त्‍या अनुषंगाने ब्रम्‍हपुरी शहरात रूग्‍णांची वाढती संख्‍या लक्षात घेता शहरातील नागरीकांनी जनता कर्फ्यु मध्‍ये सहभागी होवुन सहकार्य करण्‍यास व्‍यापारी संघटना, सामाजिक संघटना व सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी तर्फे आव्‍हान करण्‍यात आले होते. या जनता कर्फ्यु मध्‍ये रूग्‍णालय, औषधालय, कृषी केंद्र, शासकीय कार्यालय दुध वितरण, पार्सल सुविधा, पेट्रोल पंप, वर्तमानपत्र वितरण, एम.आय.डि.सी. मधील सर्व आस्‍थापना, सुरू आहेत, तसेच बँका फक्‍त अंतर्गत कामकाजासाठी सुरू असून, परंतु ग्राहक सेवेसाठी बंद आहेत. या व्‍यतीरिक्‍त संपुर्ण दुकाने आस्‍थापना, बंद आहेत. एकंदरीत जनता कर्फ्युचा पहिला दिवस यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे.