माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री स्वर्गीय शांतारामजी पोटदुखे यांच्या द्वितीय स्मृतिदिन निमित्त भव्य रक्तदान शिबीर

17

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-९६२३८९६५७४

जिवती(दि.25सप्टेंबर):-चंद्रपूर भूषण स्वर्गीय शांतारामजी पोटदुखे ,माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री तथा संस्थापक अध्यक्ष सर्वोदय शिक्षण मंडळ , चंद्रपूर.यांचे द्वितीय स्मृतिदिन निमित्त महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.

हा कार्यक्रम फेसबुक लाईव्ह घेण्यात आला . महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी नागरिकांनी फेसबुक लाईव्ह पेज वर कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते.
स्वर्गीय शांतारामजी पोटदुखे यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाविद्यालयांमध्ये विनम्र आदरांजली कार्यक्रम आयोजित करून भव्य रक्तदान शिबीर व वृ क्ष रोपण कार्यक्रम महाविद्यालय चे प्राचार्य डॉ.सुनील साकुरे , उपप्राचार्य प्रा. नरेंद्र टिकले राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. सुभाष गिरडे व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.याप्रसंगी स्वर्गीय शांतारामजी पोटदुखे यांच्या कार्याचा उजाळा मान्यवरांनी दिला. विनम्र आदरांजली देऊन अभिवादन केले.

भव्य रक्तदान शिबिर हनुमान मंदिर ता. जिवती जि. चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले.या शिबिराचे उद्घाटनक माजी आमदार श्री. वामनराव चटप उपस्थित होते.त्यांनी रक्तदान शिबिराचे उद्घाटन करून स्वर्गीय शांतारामजी पोटदुखे यांच्या कार्याचा उजाळा दिला .व आयोजकांना शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना व नागरिकांना हा कार्यक्रम लाईव्ह बघताय यावा.यादृष्टीने महाविद्यालयाने फेसबुक लाईव्ह कार्यक्रम आयोजित केलेला आहे . त्यासाठी सर्वांनी प्रतिसाद दिला.
त्याच प्रमाणे स्वर्गीय शांतारामजी पोटदुखे यांच्या कार्याविषयी ,त्यांच्या प्रत्यक्षात मुलाखती त्यांच्या यूट्यूब चैनल वरील लिंक पाठविण्यात आल्या.

कोरोना च्या संकटामुळे सर्व जग हादरून गेलं. महाराष्ट्रा मध्ये कोरोना च्या संकटाचे जाळे ओढावले गेले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील साकुरे यांच्या मार्गदर्शन व नियंत्रणात महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने जिवती, येथे दिनांक २४/०९/२०२० वार गुरुवार रोजी हनुमान मंदिर परिसर जिवती येथे श्री रुग्णसेवक जिवन तोगरे ( रा.से.यो.स्वयंसेवक) यांच्या पुढाकारातून व , विदर्भ युवा आघाडी, जिवती चे सुदामभाऊ राठोड, विनोद पवार,संजीवनी शेती व शिक्षण विकास संस्था जिवती चे स्वयसेवक महादेव केंद्रे, संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक व कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. सुभाष गिरडे व प्रा. किरणकुमार मनुरे तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक विद्यार्थी , आजी माजी विद्यार्थी एस .आर .एम. कॉलेज ऑफ सोशल वर्क व तसेच महाविद्यालयाचे इतर सर्व विद्यार्थी व जिवती तालुक्यातील ग्रामस्थ तसेच मानवतावादी रक्तवीर रक्तदाते यांच्या सहकार्याने संपन्न रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी सहभाग घेऊन रक्तदान केले.

या रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी नगरपंचायत जिवती, पोलिस, ग्रामस्थ यांचे विशेषसहकार्य लाभले. तसेच शिबिराच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे आजी व माजी विद्यार्थी यामध्ये महादेव केंद्रे, कैलास लांडगे, दयानंद राठोड, मुकेश चव्हाण श्रीकांत राजपंगे,जीवन तोगरे, बालाजी शीवमोरे, अक्षय सुर्यंवशी, विलास राठोड, अरविंद चव्हाण, इरफान शेख यांनी शिबिरात सहभागी होवून अथक परिश्रम घेतले…