

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841
हिंगणघाट(दि.25सप्टेंबर):- शहर व ग्रामीण परिसरात वाढत असलेल्या कोरोना आजारावर प्रतिबंधक उपाय म्हणून दिनांक 25 सितंबर से 1 आक्टोंबर पर्यंत हिंगणघाट बंद च्या प्रथम दिवशी व्यापारी,किरकोळ विक्रेते व जनतेने बंदला स्वयंस्फूर्त प्रतिसाद दिलेला असल्याचेदिसून आले. आजच्या bandla शहरातील सर्वच लहान मोठे व्यापारी वर्ग, किरकोळ दुकाने, भाजीपाल्या ची दुकाने,चहा टपरी,पानठेले तसेच अन्य किरकोळ वस्तू विक्रेत्यांनी बंद पाळला. प्रमाणे आज सकाळी पासूनच कोविड 19 हिंगणघाट बचाव समिति च्या सदस्यांनी पूर्ण शहरात मास्क न घालणाऱ्या लोकांना मास्क देऊन विनाकारण बाहेर न फिरण्याची विनंती केली तसेच शहरातील प्रमुख चौकात उगाच गर्दी करणारे लोकांना सोशल डिस्टेंसिंग चा पालन करावे अशी विनंती करुन घरातच राहण्याचे आवाहन केले..
यात पोलिस प्रशासन व नगर पालिका प्रशासनाने देखील सकाळी पासून मास्क न घालणारे लोकांना दंडात्मक कार्यवाही करुन मास्क देऊन कोरोना विषयी जागृत केले…हिंगणघाट बचाव समितीचे सर्वश्री . सुनिल डोंगर,डॉ. निर्मेश कोठारी, गजु कुबडे, अंकुश ठाकूर, दिनेश वर्मा, मनोज रुपारेल, अमोल बोरकर, रुपेश लाजुरकर, धनंजय बकाने, देवा कुबडे,अनिल मुन, आशिष पर्बत,गोमा मोरे, धनराज कुंभारे, मनिष लाहोटी, कदिर बक्ष, साकीब शेख, अतुल नंदागवाली, राहुल दारुनकर, बाला मानकर, जगदीश तेलहांडे, हितेंद्र हेमके, आदि सर्व सदस्यांनी आज सहकार्य केले.
जनतेने जनतेसाठी स्वयंस्फ्रूर्तीने पाळलेला अभूतपूर्व बंद असे या बंदचे वर्णन करता येईल. पुढील 1 तारखेपर्यंत जनतेनी व सर्व व्यापारी वर्गांनी एकजुटीने कोरोनाला मात देण्यासाठी बंद पाळावा अशी विनंती हिंगणघाट बचाव समितीने केली आहे.