हभपश्री.माधव महाराज शास्री घोटेकर यांची नाशिक जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड

    42

    ✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-996022743

    नाशिक(दि.25सप्टेंबर):-नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील वारकरी संप्रदायाचे एक अभ्यासु व्यक्तीमत्व व सर्व श्रृत सुपरिचीत असणारे हभपश्री.माधव महाराज (शास्री) घोटेकर खेडलेकर यांची नुकतीच महाराष्ट्र वारकरी महामंडळ जिल्हा उपाध्यक्ष पदी सर्वानुमते नियुक्ती करणेत आली आहे. महामंडळाची बैठक तालुकाध्यक्ष हभपश्री.हरिश्चंद्र आप्पा भवर यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. जिल्हाध्यक्ष हभपश्री.आण्णासाहेब महाराज आहेर हिसवळकर यांनी नुकतेच त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे.

    हभपश्री.माधव महाराज शास्री यांचे निवडीचे प्रदेशाध्यक्ष हभप श्री.आर.के.रांजणे, कार्याध्यक्ष हभपश्री.रामेश्वर महाराज शास्री,द्वाराचार्य हभपश्री.रामकृष्ण महाराज लहवीतकर,मार्गदर्शक समिती प्रमुख हभपश्री.पंडीत महाराज कोल्हे,मार्गदर्शक समिती प्रमुख हभपश्री.श्रावण महाराज आहिरे,जिल्हा उपाध्यक्ष हभपश्री.चंद्रकात दादा आहेर,जिल्हा कार्याध्यक्ष हभपश्री.बाळकृष्ण महाराज शास्री,कोषाध्यक्ष हभपश्री बाळासाहेब महाराज कबाडे,कोषाध्यक्ष हभपश्री.दत्तात्रय पा.डुकरे,तालुकाअध्यक्ष हभपश्री हरिश्चद्र आप्पा भवर,युवा समिती जिल्हा उपप्रमुख हभपश्री राजेंद्र महाराज थोरात,व सर्व महामंडळ कमिटीने स्वागत केले आहे.हभपश्री.ठोके शास्री कार्याध्यक्ष पदाला योग्य न्याय देतील अशी अपेक्षा हभपश्री तुकाराम महाराज क्षिरसागर यांनी व्यक्त केली आहे.निफाड शहर व सर्व जिल्हाभर त्यांचे नियुक्तीचे सर्वत्र स्वागत करण्यात आले आहे.जिल्हाध्यक्ष हभपश्री आण्णासाहेब महाराज आहेर यांनी ही हभपश्री माधव महाराज शास्री घोटेकर व हभपश्री बाळकृष्ण महाराज ठोके शास्री यांचे अभिनंदन केले आहे.