✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260
नांदेड(दि.25सप्टेंबर):-बरबडा ता. नायगाव जि. नांदेड येथील एका १२ वर्षीय चिमुकलीचा तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली असून,या घटनेमुळे संपूर्ण बरबडा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
श्रेयसी दिगंबर पुपलवाड अस या चिमुकलीच नाव असून,इयत्ता सहावीत शिकणारी श्रेयसी ही आपल्या आई-वडिलांसोबत कराड (सातारा) येथे राहत होती.कराड येथील तिच्या राहत्या घरी १६ ऑगस्ट रोजी तिसऱ्या मजल्यावर कपडे काढत असताना तोल गेल्याने ती खाली कोसळली.
त्यानंतर काही दिवस तिथेच उपचार चालू असताना पुढील उपचारासाठी तिला पुण्याच्या नामांकित हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते.मात्र उपचारास प्रतिसाद देत नसल्याने तब्बल सव्वा महिने मृत्यूशी झुंज देत असलेल्या श्रेयसीची अखेर गुरुवारी ता.२४ रोजी दुपारी प्राणज्योत मालवली.शुक्रवारी ता.२५ रोजी सकाळी १० वाजता तिच्यावर मूळगावी बरबडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.कराड येथे असणारे शिक्षक दिगंबर पूपलवाड यांची मुलगी तर गोविंद तुकाराम पुपलवाड यांची ती पुतणी असून,या घटनेमुळे पुपलवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.