✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.25सप्टेंबर):-महाराष्ट्र शासनाचे ग्रामीण जीवनोन्नती अभियान खाजगीकरण करीत कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याचा निर्णय घेतल्याने दि.२३ रोजी याचा निषेध करीत महिला कर्मचाऱ्यांनी स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन दिले.

कोरोनाकाळात शासनाने या ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे खाजगीकरण करीत सदर महिला कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याचा निर्णय घेतल्याने आयटकप्रणीत कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे मागणीचे निवेदन दिले.

याप्रसंगी श्रीमती कुंदा पाटिल,मनीषा पाटिल,जयश्री बेताल,आशा गवळी,किरण झाड़े इत्यादिसह कर्मचारी महिला उपस्थित होत्या.

महाराष्ट्र, मागणी, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED