मतदारांनी मतदार यादीत नाव असल्याची सहानिशा करावी – उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ

29

✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.25सप्टेंबर):-१ जानेवारी २०२० या अहर्ता दिनांकावर आधारीत विधानसभा मतदार संघाच्या छायाचित्र मतदार यादीचा सखोल प्रकारे संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमानुसार अद्यावत करण्यात आलेली चिमूर विधानसभा मतदार संघातील छायाचित्र मतदार याद्या दिनांक २५ सप्टेंबर २०२० रोजी ७४ चिमूर विधानसभा मतदार संघातील मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय, सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार चिमूर, नागभीड व ब्रम्ह्पुरी यांचे कार्यालय तसेच चिमूर विधानसभा मतदार संघातील ३१२ मतदान केंद्रावर तसेच पंचायत समिती व नगर परिषद चिमूर, नागभीड व ब्रम्ह्पुरी या कार्यालयात प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत.

मतदारांनी मतदार यादीत नाव असल्याची सहानिशा करावी असे आवाहन ७४ चिमूर विधानसभा मतदार संघातील मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांनी केले. भारतीय लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सर्वांनी मतदान करणे काळाची गरज आहे. मतदानाविषयी जनजागृती करण्याच्या दृष्टीने सर्वत्र विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. मतदार हा लोकशाहीचा कणा आहे.

त्याकरिता मतदारांनी मतदार यादीत नाव असल्याची सहानिशा करावी असे आवाहन ७४ चिमूर विधानसभा मतदार संघातील मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांनी केले.