✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-९६२३८९६५७४

कोरपना(दि.25सप्टेंबर):-भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली श्री नारायण हिवरकर भाजपाध्यक्ष कोरपना तालुका यांच्या हस्ते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्प अर्पण करण्यात आले तसेच गरजूंना अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले व आपल्या घरासमोर झेंडा लावून जयंती साजरी करण्यात आली.

श्री नारायण हिवरकर यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जीवनावर प्रकाश टाकत पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा जन्म २५सप्टेंबर १९१६रोजी झाला व त्यांना देवाज्ञा ११फेब्रुवारी १९६८ मध्ये झाली राष्ट्रीय स्वयमंसेवक संघाचे चिंतक होते व संघटक कार्यकर्ते सुद्धा होते व ते भारतीय जनसंघाचे अध्यक्ष होते. व ते एक समावेशीक विचारधारा चे समर्थक होते ते एक मजबूत व सशक्त भारत बनावं असे त्यांना वाटत होते राजनीतीत व साहित्यामध्ये त्यांना रुची होती त्यांनी हिंदी व इंग्रजी भाषांमध्ये अनेक लेख लिहिले आहे.

भारतीय जनसंघ भारतात एक जुना राजनीतिक दल होता ज्यापासून १९८० मध्ये भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता असे मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नारायण हिवरकर भाजपाध्यक्ष कोरपना तालुका प्रमुख पाहुणे श्री राजू चिकटे,श्री दिनकर शिरसागर,श्री दिवाकर गेडाम श्री आशिष चिकटे सौ मंदाताई हिवरकर,श्रीमती अनुसया बाई गेडाम,श्रीमती शांताबाई गेडाम आधी भाजप पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन श्री दिवाकर गेडाम यांनी केले तर आभार दिनकर शिरसागर यांनी मानले.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED