बीड जिल्ह्यातील बँकाच्या अडमुठ्ठे धोरणावर प्रशासनाचे व सरकारचे दुर्लक्ष – सुनील ठोसर पाटील

  51

  ✒️नवनाथ आडे(गेवराई,विशेष प्रतिनिधी):-9075913114

  बीड(दि.25सप्टेंबर):-जिल्डह्यातील शेतकऱ्याने खरीपाच्या पिकासाठी जिल्ह्यातील अनेक बँकेच्या शाखेमध्ये पीक कर्जासाठी अर्ज केलेले आहेत. परंतु विविध कारणाने “सिबिल” खराब असल्याच्या कारण देत हजारो शेतकऱ्यांचे पीक कर्जाचे अर्ज बँकांनी स्थगित ठेवलेले आहेत. असंख्य शेतकऱ्यांनी बेबाकी प्रमाणपत्र देऊन देखील केवळ ऑनलाईन ला अपडेट नसल्यामुळे या कारणामुळे सदरील शेतकऱ्यांना पिक कर्ज बँकांनी दिलेले नाही.

  शासनाने फेरफार न घेता पीककर्ज वाटप करणे आदेश दिले असताना अनेक बॅंकांनी फेरफर च्या नावाखाली शेतकरी बांधवांना अडवणूक केली असून यात शेतकरी बांधवांना अनेक खेटे घालावे लागले आहेत अनेक तहसील व तलाठी यांचेकडे फेरफार अद्यापही भेटलेले नाही अनेक ठिकाणी शेतकरी बांधवांना अर्ज केला तेही विविध कार्यालयात धूळ खात पडून आहे याकडे जिल्हाधिकारी साहेबांनी वेळीच लक्ष घालावे अशी मागणी अनेक शेतकरी बंधूंनी रयत शेतकरी संघटनेच्या विविध पदाधिकारी यांचेकडे केली आहे.

  महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात नसलेला हा न्याय बीड जिल्ह्यातील बँकांनी शेतकऱ्यांना लावलेला आहे. यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्या अन्याय झालेला आहे व त्यांना पिक कर्ज मिळाले नाही. यामुळे असंख्य शेतकर्‍यांना खाजगी सावकाराच्या दावणीला बांधण्याचे महापाप जिल्ह्यातील बँका करत आहेत. यास्तव शिबिल च्या कारणामुळे स्थगित असलेल्या सर्व शेतकऱ्यांना शेवटपर्यंत एकही सातबारा पीक कर्जाची वाटप करण्यात यावे या निवेदनाद्वारे अशी मागणी करण्यात येत आहे.

  शिवाय पिक कर्ज वाटपाची अंतिम तारीख ३० सप्टेंबर असल्यामुळे अशा शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्याचा शक्यता कमी होत आहेत यामुळे जिल्हाधिकारी व जिल्हा निबंधक साहेबांनी सदरील पिक कर्ज वाटपाची तारीख न ठरवता सर्व शेतकरी बांधवांना पीककर्जवाटप करणे बंधनकारक करण्यात यावे शासनाने तीनवेळा कर्ज माफी केली बीड जिल्ह्यातील अनेक शेतकरी एकदाही कर्ज माफी यादीत आलेले नाही अश्या सर्व शेतकरी बांधवांना आत्ताची कर्ज माफित समाविष्ट करण्यात यावे बीड जिल्ह्यातील अनेक शेतकरी वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी घेतलेले पीककर्ज अजूनही माफ झालेले नाही अश्या सर्व थकीत पीककर्ज व सातबारा कोरा करण्यात यावा शासनाच्या आजपर्यंत परिपत्रक नुसार बीड जिल्ह्यातील अनेक बॅंकांनी पिक विमा रक्कम खाते ब्लॉक केले व अनेक शेतकरी बांधवांचे सर्व पीकविमा रक्कम तत्काळ शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा करण्यात यावे बीड जिल्ह्यातील अनेक बॅंकांनी शेतकरी बांधवांना कोरोना काळात वेठीस धरून एजंट मार्फत लुटण्याचा गोरज धंदा सुरू आहे बीड जिल्ह्यातील सर्व बँकांना बँकेची नियमावली सर्व रक्कम आकडा व वाटप उदिष्ट फलक लावणे बंधकारक कराव बीड जिल्ह्यातील एकही बँकेवर दोषी शाखा व्यवस्थापक यांचेवर कार्यवाही केली नाही.

  याकडे शासन व प्रशासन विभागाने लक्ष वेळीच दिले नाही तर अड रविप्रकाश उर्फ बापूसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच रयत शेतकरी संघटना बीड जिल्हा वतीने सर्व शाखेवर बैलगाडी मोर्चा, आसूड मोर्चा सर्व शेतकरी बांधवांना पीककर्ज मिळेपर्यंत चालू राहील अशी मागणी बीड जिल्हा प्रमुख रयत शेतकरी संघटना सुनील नानासाहेब ठोसर पाटील, प्रमोद डोंगरे, नवनाथ आडे, अनिल काकडे, आदित्य ठोसर, दत्ता वाळेकर, संकेत वरांगे, प्रल्हाद जाधव, विष्णु काकडे, बेळेश्र्वर सूर्वसे, भगवानराव कदम, शिवदास सोळुंके, नईम अत्तर, अमोल भोकरे, अक्षय माने, भागवत वैद्य, शाहीन पठाण, मंगल आगलावे, माऊली नवले, बाबुराव भोईटे, राम नवले, राजे भाऊ मोरे, अर्जुन चाटे व सर्व रयत शेतकरी संघटनेचे शेकडो पदाधिकारी व बीड जिल्ह्यातील अनेक शेतकरी बांधवांनी आमचे प्रतिनिधी यांचेशी बोलताना सांगितले असून बॅंकांनी शेतकरी बांधवांना त्रास दिल्यास शेतकरी सोबत आसूड घेऊन बँकेत प्रवेश करतील यात शंका नाही असेही रयत शेतकरी संघटनेचे बीड जिल्हा प्रमुख सुनील ठोसर पाटील यांनी सांगितले आहे.