गेल्या 2 वर्षापासून करतो हा माफिया धान्याचा काळाबाजार

  48

  ?विरखंडी येथील स्वस्त धान्य दुकानदाराचा काळाबाजार प्रशासनाची कार्यवाही मात्र शून्यच!

  ✒️कुही(पुरोगामी संदेश नेटवर्क)

  मांढळ(दि.25सप्टेंबर):- कोरोंनाच्या भिषण परिस्थितीत सामान्य लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते.संपूर्ण देशात कोरोनाची महामारी आल्याने भारत सरकारसह राज्य सरकारने कोरोनावर मात करण्यासाठी अनेक उपाययोजनांची सुविधा जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला गेला. नागरिकांचे रोजगार बुडाल्याने व घराबाहेर निघणे कठीण झाल्याने शासनाच्या अन्न व पुरवठा विभागामार्फत माहे एप्रिल पासून कुणीही उपाशी राहू नये या नियोजनातून मागील ५ महिन्यापासून शासकीय राशन दुकानांच्या माध्यमातून अंतोदय,प्राधान्य व ए.पी.एल शिधाधारकांना धान्य वाटपासाठी अन्न-धान्यांचा पुरवठा करण्यात आलेला होता. कुही तालुक्यातील विरखंडी गावात स्वस्त धान्य राशन दुकानदाराचा काळाबाजार माहे एप्रिल मध्ये उघडीस आला होता. २ वर्षापासून हा काळाबाजार सुरू असल्याचे ग्रामस्थांनी संगितले. कोरोनाच्या बिकट काळात केंद्र शासनाने व राज्य शासनाने अन्न पुरवठा विभागाला भरमसाठ अन्नाचा पुरवठा केला होता.तो धान्य पुरवठा दुकानदारांना नोंदी सहित देण्यात आला होता. परंतु कोरोनाचे संकट लक्षात न घेता या अवैध प्रकाराचा ग्रामस्थांनी विक्रेत्याला जाब विचारलं असता अरेरावी करून तो त्यांना हाकलून लावतो. हा सर्व प्रकार लक्षात घेत ग्रामस्थांनी या माफियाचा स्वस्त धान्य दुकानदाराचा परवाना रद्द करा अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.

  अन्न पुरवठा विभागाकडून नोंदीसहित भरमसाठ अन्न धान्याचा पुरवठा मिळाल्यावरही विरखंडी गावातील स्वस्त धान्य दुकानदार लाभर्थ्याकडून जास्त पैसे घेऊन कमी धान्य देतो असा प्रकार विरखंडी गावातील “युवा ग्राम रक्षक” समितीने पाहिला. विरखंडी गावातील श्री. मनोहर लोखंडे यांच्याकडे शासकीय स्वस्त धान्याचे दुकान आहे. मात्र हा काळाबाजार करणारा माफिया अंतोदय धारकांना २० किलो धान्याचा पुरवठा करतो,जे की शासनाने अंतोदय धारकांना ३५ किलो धान्य निर्धारित केले आहे,तसेच बीपीएल धारकांना शासनाने प्रती व्यक्ति ५ किलो धान्य निर्धारित केले असता,त्यांना फक्त १० ते १५ धान्य देतो,असा प्रकार मागील २ वर्षापासून सुरू असल्याची माहिती या गावातील ग्रामस्थ व युवा ग्राम रक्षक समितीने दिली.

  हा प्रकार लक्षात घेऊन युवा ग्राम रक्षक समितीने कोणत्या कार्ड धारकास किती धान्य मिळते याची ऑनलाइन माहिती काढली व त्यानंतर या सर्व प्रकाराचा जाब विचारण्यासाठी ग्रामस्थ व ग्राम रक्षक समिती गेली असता,या विक्रेत्यांनी त्या तरुनांना बरजबळी करून हाकलून लावले, इतकेच नाही तर त्यांना धमक्या दिल्या की,”जर कोणी माझ्या विरुध्द गेले तर त्यांच मी बर वाईट करून टाकीन,” अश्या बेकायदेशीर व्यवहारामुळे व या काळाबाजारामुळे या माफियाचा परवाना रद्द करून त्वरित याच्यावर कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

  या सर्व घटनेची विचारपूस सरपंचाला केली असता,सरपंच,उपसरपंच देखील या घटनेचे समर्थन करतो असे आमच्या प्रतिनिधीचे म्हणणे आहे.”रात्रीस खेळ चाले….” या म्हणीचा प्रत्यक्ष उपयोग या गावी होत असल्याचे दिसते. सरपंच,उपसरपंच यांच्या घरी रात्री सभा घेऊन आपल्यावर योग्य ती कार्यवाही तर होणार नाही ना ! या विषयावर चर्चा केली जाते.हा सर्व प्रकार गावातील युवा ग्राम रक्षक समितीच्या सदस्याकडे रेकॉर्ड आहे. “माझ्याविरुद्ध बोलू नको,यासाठी किती रुपये देऊ,” असे आकस्मिक शब्द व लालची वृत्तीचे शब्द हे बडे नेते व विक्रेता करतो,अशी तक्रार ग्राम रक्षक समितीच्या सदस्याने केली आहे. उपरोक्त घटनेत हा माफिया शिधापत्रिका धारकाकडून शासकीय दरापेक्षा जास्त पैसे घेतो,ऑनलाइन नुसार धान्य वाटप करीत नाही,धान्याची पावती देत नाही असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

  एप्रिल मध्ये या घटनेची चौकशी नायब तहसिलदार श्री. अंबादे यांनी केली होती.यानंतर या माफियावर चौकशी करून काही दिवसांसाठी याचे दुकान निलंबित करण्यात आले होते,मात्र काही दिवस सुरळीत काम करून नंतर पुन्हा या माफियाने पुन्हा काळाबाजाराचा थैमान घालणे सुरू केले.प्रशासनाला या बाबत अनेकदा निवेदन देऊन सुद्धा प्रशासनाची या माफिया विरूद्धची कार्यवाही मात्र शून्यच…. या सर्व प्रकारात प्रशासनाची या माफिया सोबत साठ गाठ तर नसेल? अशी चर्चा विरखंडी गावात हवेसारखी पसरत आहे. या संबंधित युवा ग्राम रक्षक समितीने आमदार,उपविभागीय अधिकारी,जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे निवेदन दिले असून या घटनेची प्रशासन दखल घेत नसून या घटनेचे प्रशासन समर्थन करताना दिसतात. इतकेच नव्हे तर युवा ग्राम रक्षक समिति व गावातील नागरिक तहसिलदाराकडे निवेदन देण्यासाठी गेले असता तहसिलदार श्री. तीनघसे आमच्या कडे एकाच काम नाही आहे.

  असे बोलून युवांवर अरेरावी करून त्यांचे निवेदन फेटाळून लावले. राज्य सरकारतर्फे सामान्य कुटुंबाला फायदे मिळण्याच्या उद्देशाने अनेक योजना अमलात आणण्याचा प्रयत्न करतात.परंतु सामान्य माणसांचा तोंडसा घासचं असे काही ठराविक राशन दुकानदार खात असतील तर अश्या दुकानदारांचे परवाने तातडीने रद्द करणे गरजेचे आहे. अन्यथा या दुकांदारांच्या अनागोंदी कारभारमुळे संपूर्ण प्रशासनातील अधिकारी बदनाम होतील व सामान्य नागरिकांच्या संबंधित विभागावरून विश्वास उडल्याशिवाय राहणार नाही. सरपंच,उपसरपंच,पोलिस पाटील,स्वस्त भाव दुकानदार व बडे नेते याच्याविरुद्ध आवाज उठवल्याणे त्यांनी युवा ग्राम रक्षक समितीचे उपाध्यक्ष श्री. विलास गजभिये यांच्यावर लाठींचा हल्ला केला. सबब घटनेची तक्रार देण्यासाठी पोलिस स्टेशन वेलतुर ला गेले असता तिथे तक्रार मागे घेण्यासाठी सांगून तक्रार फाडायला संगितले जाते.अश्या अकर्तव्यदक्ष व अकार्यक्षम प्रशासनामुळे विरखंडी गाव त्रासलेला आहे. निव्वळ आश्वासन देऊन कार्यवाही न करणार्‍या प्रशासनाविरुद्ध आंदोलन करण्याची वेळ युवा ग्राम रक्षक समिति व ग्राम वासीयांवर आली आहे.

  या सर्व घटनेची योग्य चौकशी झाली नाही व या भ्रष्टाचार्‍यांवर कार्यवाही झाली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू असे अनिश लोखंडे,विलास गजभिये,धिरज गणविर,दिनेश पडोळे,विक्की लोखंडे,प्रमोद कोल्हे,महेश पडोळे,अक्षय वासनिक,निखिल पडोळे,दिनेश भाकरे,नारायण डहाके,देवराव मेश्राम,रितीक लोखंडे,अक्षय खांडेकर,विजय वासनिक,मिलिंद भोवते,दिलीप डहाके,विलास शेंडे, निरूपाला गणविर, विजया लोखंडे,विजयमाला चापले,रेणुका पडोळे,आनंदाबाई पडोळे, आदि ग्रामवासीयांनी म्हटले आहे.