विश्वासघातकी राजकारण

6

२०१४ पुर्वी भाजपाने निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्यांना आश्र्वासन दिलं होतं की,स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करु…!!
पहिली पाच वर्षाची टर्म पूर्ण झाली, दुस-या टर्ममध्ये ,स्वामिनाथन आयोग तर लागू केला नाहीच ऊलट, भांडवलदार मित्रांसाठी कृषी विधेयक आणून शेतकऱ्यांना गुलाम करण्याची योजना कार्यान्वित केली आहे,असा बहूतेकांचा समज होतो आहे…!!

जनतेचा, राजकीय पुढाऱ्यांचा आणि शेतकरी बांधवांचा हा समज चुकीचा वा निराधार आहे हे पटवून देण्यासाठी,स्वामिनाथन आयोग लागू करण्यात काय अडचण होती हे एकदा भाजपच्या भांडवलदारी सरकारने शेतकऱ्यांना सांगितले पाहिजे…!!
किंवा स्वामिनाथन आयोग हा कुचकामी होता, त्यापेक्षा ही विद्यमान कृषी विधेयक शेतकरी हिताचे आहे हे तरी पटवून द्या…!!
कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल हे “हवेतील बाण” चालवण्यापेक्षा कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत शेतकऱ्यांना मिळणारी कृषी उत्पन्नाची “आधारभूत किंमत” मिळणार की, नाही त्याचे स्पष्टीकरण कृषी विधेयकाचे समर्थन करणा-या जाणत्या शरद पवारांनी दिले पाहिजे…!!

पास झालेल्या कृषी बिलात “आधारभूत किंमत” ठरविण्याचे अधिकार कुणाला आहेत ते तरी सांगा…??
कृषी उत्पन्न बाजार समित्या बरखास्त झाल्यावर शेतकऱ्यांची हक्काची जागा निघून गेल्यावर शेतकऱ्यांनी कुणाच्या तोंडाकडे पहावे…??
गरीब,अल्पभुधारक आणि कोरडवाहू शेतकरी आपल्या कृषी मालाला योग्य भाव मिळण्यासाठी साठेबाजी करु शकतो का..??

शेतकऱ्यांची सर्वच पिकांची साठेबाजी करता येते का….??
निसर्गाच्या लहरीपणामुळे सडलेला कृषी माल आणि त्याची “आधारभूत किंमत” कोण ठरविणारं…??
‌व्यापारी कृषी क्षेत्रात आल्यानंतर तो फायदा बघेल की, शेतकरी हिताचे निर्णय घेईल हे कुणालाच नव्याने सांगायची गरज नाही…!!
भारतात व्यापारी बनुन आले आणि राज्यकर्ते बनले या व्यापा-यांच्या नितीचा भारताला दिडशे वर्षाचा अनुभव आहे…!!
शेतकऱ्यांना गुलाम करणारा कायदा हवेत बाण चालवून राज्यसभेत पास केला आणि त्यासाठी शेतकऱ्यांचे पुढारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब गैरहजर राहिल्याने खूप लोकांना वाईट वाटले आणि शेतकऱ्यांना तर विषाद वाटला की, आता कुणाच्या तोंडाकडे बघावे…!!
पंजाब हरियाणा आणि दिल्ली मध्ये शेतकरी रस्त्यावर उतरून या कृषी बिलाचा विरोध करीत आहेत, पंजाब मध्ये एकुण सतरा शेतकरी संघटना, अकाली दल, आणि कॉग्रेस पक्ष रस्त्यावर ऊतरला आहे…!!

महाराष्ट्रात मात्र शेतकऱ्यांची बाजू घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करायला अद्यापही कुणी तयार झाले नाही ही किती मोठी शोकांतिका आहे…!!
आम्ही महाराष्ट्राच्या दर पंचवार्षिक निवडणुकीत नवनवीन शेतकरी घोषणा ऐकतो आहे,कुणी म्हणतो शेतकरी कर्जमाफी देणार,आम्हाला मते द्या….!!
कुणी म्हणतो सातबारा कोरा करणारं,आम्हाला मते द्या…!!
कुणी म्हणतो आम्ही शेतकऱ्यांना पेन्शन लागू करणार आम्हाला मते द्या…!!
गेली ६०वर्षे शेतकऱ्यांची मते घेणारे,स्वत:ला शेतकरी पुत्र म्हणवून घेणारे आता शेतकरी बांधवांसाठी रस्त्यावरची लढाई लढणार आहेत की, नाही…???
शेतकऱ्यांची आजची अवस्था “तेलही गेले,तुपही गेले,हाती धुपाटणे राहिले “, अशीच झाली आहे…!!

शेतकरी दादा,तु शेतकरी बनुन लोकशाही व्यवस्थेत राहण्या ऐवजी तु कुठल्यातरी “जातीचा” झाला…!!
जातीच्या उमेदवाराला मते देत राहिला त्यामुळे सदनात शेतकरी प्रतिनिधी गेलाच नाही…!!
शेतकरी दादा तु शेतकरी बनुन लोकशाही व्यवस्थेत राहण्या ऐवजी तु कुठल्यातरी “धर्माचा” वाहक झाला…!!
धर्माच्या नावाखाली लूटारुंना मते देत राहिला परिणामी आज तुलाच गुलाम करण्याची त्यांची हिम्मत झाली…!!
परिणामी तुझी शेतकरी छबी गळद होण्याऐवजी संधीसाधू नेत्यांनी तुला नागविले हे वास्तव तु लक्षात घेशील का…??
शेतकरी जर ऊद्या भांडवली व्यवस्थेत भरडल्या गेला तर या अवस्थेला शेतकऱ्यांच बोटचेपं धोरण सुद्धा कारणीभूत असणार आहे हेही वास्तव लक्षात घ्यावे लागेल…!!
काही का असेना मात्र, भांडवलदारी व्यवस्थेच्या विरोधात भारतातील सामान्य माणसाला रस्त्यावर उतरून लढाई करायची वेळ आली आहे हे लक्षात घ्यावे एवढे मात्र निश्चित…!!
“एकमेका सहाय्य करू,अवघे धरू सुपंथ”
या मार्गावर आरुढ व्हावेच लागेल ही खुनगाठ पक्की मनात बांधा,ही नम्र विनंती…!!

✒️लेखक:-प्रा.भास्कर भोजने सर
( राजकीय विश्लेषक, पुरोगामी चळवळीचे भाष्यकार, विचारवंत, जेष्ठ मार्गदर्शक अकोला जिल्हा)
मो-9960241375

▪️संकलन:-नवनाथ पौळ
( केज विशेष प्रतिनिधी)
मो-8080942185