आलापल्ली येथे ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ उपक्रमाचे प्रारंभ

18

🔹माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी शुभारंभ केले

🔸स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन केले

✒️अहेरी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

अहेरी(दि.26सप्टेंबर):- कोरोना या जीवघेणी व संसर्गजन्य रोग रोखण्यासाठी राज्यशासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ हे उपक्रम राबवित असून आलापल्ली येथे शुक्रवार 25 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आले.
या शुभारंभी कार्यक्रमात तालुका आरोग्य अधिकारी डॉ.किरण वानखेडे, उपसरपंचा पुष्पाताई अलोने, राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, ज्येष्ठ नागरिक गौरूबाई अलोने आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी , अनेक कुटुंबियांच्या घरी भेटी देऊन अक्षरशः थरमल स्कॅनरनी तापमान मोजले व पल्स आक्सीमीटरनेही तपासणी केले आणि प्रत्येकांनी मास्क लावून, सॅनिटायझरचा वापर करावे व गर्दी टाळावे असा सल्ला देऊन स्वतःची व कुटुंबाची योग्य काळजी घेण्याचे यावेळी आवाहन केले व प्रत्येकांनी ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ या उपक्रमात सहभागी होऊन विशेषतः कोरोना व आरोग्याची योग्य काळजी घेण्याचेही मौल्लीक सल्ला भाग्यश्री ताई आत्राम यांनी दिले.

तद्नंतर तालुका आरोग्य अधिकारी किरण वानखेडे व त्यांच्या चम्मूनी प्रत्येक घरात आरोग्याची तपासणी करण्याची मोहीमेला सुरुवात केले. यावेळी डॉ.अल्का उईके, संगीता मालदार, सुचिता खोब्रागडे आदी उपस्थित होते.