✒️नितीन राजे(खटाव,जिल्हा सातारा- विशेष प्रतिनिधी)मो:-9822800812

खटाव(दि.26सप्टेंबर):-म्हसवड ता. माण जि.सातारा येथे
म्हसवड व परिसरातील सामान्य गोर-गरीब नागरीकांना आॅक्शीजन मुळे कठिण प्रसंग कोरोनाच्या या महामारीत येवू नये यासाठी आम्ही म्हसवडकर यांनी लोकवर्गणीच्या माध्यमातून लोकसहभागातुन सुरु केले.

१५ बेडचे ऑक्सीजनसह कोव्हीड सेंटरला आॅक्शीजनची टंचाई भासु नये यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्री.अनिलभाऊ देसाई व कुकुडवाड जिल्हा परिषद गटाच्या जि.प.सदस्या सौ.सुवर्णाताई अरुण देसाई यांनी देसाई उद्योग समुहा तर्फे गुरुवार दिनांक २४/९/२०२० रोजी सकाळी १० वाजता कोव्हीड सेंटर या ठिकाणी ५ जंबो सिलेंडर अनिलभाऊ देसाई यांचे हस्ते भेट दिले.

या वेळी आम्ही म्हसवडकर ग्रुपचे युवराज सुर्यवंशी, राहूल मंगरुळे, कैलास भोरे, डॉ राजेंद्र मोडासे, डॉ राजेश शहा, अँड अभिजित केसकर, प्रशांत दोशी,तानाजी काटकर ,डॉक्टर कोडलकर ,गणेश माने,बंटी माने, जलिंधर खरात, लक्ष्मण सरतापे , कांता ढाले ,भागवत जानकर,अविनाश मासाळ,चैतन्य मोरे, समीर लिंगे उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED