वेदांती पाटील फुलोरा परिवाराच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

27

✒️पालघर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पालघर(दि.25सप्टेंबर):-आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा फुलोरा परिवाराच्या वतीने साजरा करण्यात आला यात शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील नामवंत मान्यवर शिक्षकांचा सन्मान “आदर्श शिक्षक पुरस्कार” देऊन करण्यात आला याप्रसंगी प्रख्यात व्याख्याते आदरणीय प्राध्यापक श्री. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व समाजसेवक माननीय चंदनमल बाफना यांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला. तसेच सदर कार्यक्रमाचे आयोजन फुलोरा कमिटी अध्यक्ष श्री. सुनील सातपुते यांनी केले.

त्यांनी पालघर तालुक्यातील सौ. वेदांती विनोद पाटील प्राथमिक शिक्षिका शाळा. नवली ता. पालघर यांची निवड केली. सतत पंचवीस वर्षे उत्कृष्ट शैक्षणिक सेवेसाठी व साहित्य क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल “आदर्श शिक्षक ‘पुरस्कार”देऊन गौरविण्यात आले. पुणेरी पगडी, फुलोरा पटका, सन्मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.