

🔸लोकनेते बाळासाहेब आंबेडकर जोपर्यंत पुढील आदेश आम्हाला देत नाहीत तोपर्यंत आम्ही कोयता चालविणार नाहीत
✒️नवनाथ पौळ(प्रतिनिधी,केज विशेष)
मो:-8080942185
अंबाजोगाई(दि.25सप्टेंबर):-अंबाजोगाई तालुक्यातील मौजे भावठाणा या गावी धावडी , सोनवळा व भावठाणा या गावातील तमाम ऊसतोड मजूर , वाहनधारक व मुकादम यांची वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात बैठक पार पडली . या बैठकीत सर्वानुमते मुकादम व मजुरांनी जोपर्यंत बाळासाहेब आंबेडकर आम्हाला पुढील आदेश देणार नाहीत तोपर्यंत ऊसतोड कामगारांना प्रति टन 400 रुपये भाव जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही कोयता चालविणार नाहीत आणि चालुही देणार नाहीत असा एल्गार करुन 1 आॅक्टोंबर पासून ऊसतोड कामगारांचा बेमुदत संपाच्या ऐलानची पुन्रघोषणा ही यावेळी करण्यात आली.
यावेळी ऊसतोड मजुरांचे नेते तथा वंचित बहुजन आघाडीचे पश्चिम जिल्हाध्यक्ष प्रा शिवराज बांगर सर व पूर्व अध्यक्ष अनिल भाऊ डोंगरे हे प्रमूख मार्गदर्शनपर उपस्थित होते . याच बैठकीत राजकारणासोबत जनसामान्यांची चळवळ करत असलेल्या वंचित बहुजन आघाडीला प्रभावित होऊन बीड जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस , शरद प्रतिभा साप्ताहिक चे संपादक , लेखक , साहित्यिक , कवी , नाटककार , कादंबरीकार विद्याधर पांडे सर यांनी प्रा. शिवराज बांगर , अनिलजी डोंगरे , नंदकिशोर सोमवंशी , जांबुवंत उर्फ संजय तेलंग , ऍड. सुभाष जाधव , अक्षय भुंबे , नितीन सरवदे, सुशांत धावारे, पत्रकार नवनाथ पौळ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश पार पडला.