
✒️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620
बीड(दि.26सप्टेंबर):-आरक्षणासाठी लढा तर उभा करावाच लागेल. पण खुर्च्या हरवलेल्या स्वार्थी बाजारू पुढ्याऱ्याच्या खुर्च्यां परत मिळवण्यासाठी नको. मतलबी नेत्यासोबत नाही तर, सामूहिक नेतृत्व उभं करून आंदोलन उभं करा. अशाच प्रसिद्धीपत्रक देत धनगर समाज संघर्ष समिती निष्ठावंत बीड जिल्हा प्रमुख दत्ता वाकसे यांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकाद्वारे म्हटले आहे की राज्यातील सर्व संघटना सर्वपक्षीय नेतृत्व सर्व पक्षातील कार्यकर्ते नेते यांच्या नेतृत्त्वात निःस्वार्थी आणि अ-राजकीय लढा उभारता आला तर नक्कीच धनगर समाजाच्या पदरामध्ये काहीतरी पडेल अन्यथा वेळोवेळी आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी महामंडळ विधान परिषद यासह विविध प्रकारच्या लालसेपोटी धनगर समाजाला धनगर समाजाचे नेते कुठल्यातरी पक्षाच्या दावणीला बांधण्याचा काम करत आहेत.
त्यामुळे आता आगामी काळामध्ये राज्यातील धनगर समाजाने या स्वार्थी नेतृत्वा पासून कायम सावधान राहून समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळवून द्यायचे असतील तर राज्यातील संबंध धनगर समाजाच्या आमदार खासदार विधान परिषदेचे आमदार माजी आमदार महामंडळाचे माजी आमदार सर्व संघटनेचे राज्य अध्यक्ष जिल्ह्याचे अध्यक्ष यांनी एकसंघ होऊन समाजाच्या उन्नतीसाठी आणि जिव्हाळ्याच्या आरक्षणाच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरले पाहिजे प्रत्येक जण आपल्या स्वार्थापोटी समाजाला कोणत्या ना कोणत्या पक्षाच्या दावणीला बांधण्याचा काम करत आहे यापुढे हे धनगर समाजाने असल्य नेतृत्वापासून सावधान राहून समाजाचा होत असलेला वापरता थांबला पाहिजे त्यामुळे धनगर समाज हा खूप मोठ्या प्रमाणात पिछाडीला जाताना दिसत आहे.
समाजाला आता स्वतंत्र आंदोलन करण्यापेक्षा सर्व समाजाला सर्व संघटनांना सोबत घेऊन आंदोलन केले तर नक्कीच महाराष्ट्र सरकारवर दबाव गट निर्माण होईल आणि त्याच्या माध्यमातून सरकारला धनगर समाजाच्या मागण्यासाठी झुकावे लागेल त्यामुळे आगामी काळामध्ये या लढ्याला सुरू ठेवण्यासाठी धनगर समाजाच्या सर्व नेतृत्वाने एकत्र येऊन धनगर आरक्षणासाठी रस्त्यावर उतरावे असे देखील दत्ता वाकसे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.
————–चौकट————-
समाजातील खेकडा वृत्ती बंद झाल्याशिवाय समाजाची प्रगती नाही…!
गेल्या 70 वर्षापासून समाज हा दारिद्र्याच्याखाई मध्ये आहे परंतु समाजातील खेचाखेची च्या प्रमाणामुळे तिच्या दिशेने जाताना दिसत आहे समाजाला आता सुधारावा लागेल अन्यथा समाजा हा आणखी अनेक वर्षे आहे त्याच परिस्थिती मध्ये राहील त्यामुळे समाजाने सर्वसमावेशक भूमिका घेणे अत्यंत गरजेचे आहे असे देखील वाकसे यांनी म्हटले आहे.