

✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587
सेनगाव(दि.26सप्टेंबर):-धनगर समाजाच्या वतीने आज दि.२५ सप्टेंबर २०२० शुक्रवार रोजी दु.१२ वा उपविभागीय कार्यालय,कळमनुरी येथे धनगर समाजाच्या विकासासाठी १००० कोटी रूपये तरतुद करून त्वरीत एस.टी.आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागण्यासाठी ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. त्यानंतर नायब तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.संतोष बांगर आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा.हेमंतभाऊ पाटील यांनी लेखी पञ देऊन आंदोलनाला जाहिर पाठींबा दिला होतो.
या आंदोलनात ॲड .रवि शिंदे ,दिनकर कोकरे ,प्रकाश नाईक ,बाळासाहेब नाईक ,ॲड .राजेश नाईक ,महेंद्र मस्के महाराज,शशिकांत वडकूते ,मारोतराव खांडेकर ,भास्कर पोले,शिवाजी ढाले,पंढरीनाथ ढाले,केशवराव मस्के ,जांबुवंत मारकड ,भगवान पावडे,विजय हराळ,बाळासाहेब वायकोळे ,गंगराव नाईक ,गजानन शिंदे ,माधवराव हाके,सतीश तांभारे ,तुकाराम मस्के ,ग्यानबा हाके, शिवम नाईक,विलास मस्के ,शैलेश ढाले,गितकुमार शिंदे ,कैलास नाईक ,सुरेश मस्के,करनोर,बेलखेडे मामा,प्रदीप मस्के यांच्यासह मोठ्या संख्येने कळमनुरी तालुक्यातील धनगर समाजबांधव आंदोलनात सामिल होते.