लोणी येथे भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या शाखेचे उद्घाटन

5

✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587

सेनगाव(दि.26सप्टेंबर):-दिनांक 24/9/2020 रोजी लोणी येथे भूमिपुत्र शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष सं.कृ.उ.बा.स. रिसोडचे मा.विजयराव गाडे, कार्यक्रमाचे उद्घाटक मा. श्री. विष्णुपंत भुतेकर संस्थापक अध्यक्ष शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य, प्रमुख उपस्थिती जिल्हाध्यक्ष भुमिपुत्र शेतकरी संघटना राम पाटील बोरकर, राहुल डांगे, शहराध्यक्ष रिसोड मयूर हिवाळे, विद्यार्थी आघाडी रिसोड रवि चोपडे, प्रमुख मार्गदर्शक पंजाब नरवाडे, गोरखनाथ पाचारणे, तानाजी गाडे, लोणी चे सरपंच अरविंद गाडे व अनेक कार्यकर्ते व गावातील नागरिक उपस्थित होते.

या सर्वांच्या उपस्थितीत लोणी येथील शाखा उघडण्यात आली व काही पदाधिकाऱ्यांना पदभार देण्यात आला. लोणी जि.प.स. अध्यक्ष पदी समाधान गाडे, शाखा अध्यक्षपदी रवी गाडे, शाखा उपाध्यक्षपदी प्रदीप गाडे, मयूर हिवाळे यांची विद्यार्थी आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी नियुक्त्या करण्यात आल्या.