✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587

हिंगोली(दि.26सप्टेंबर):-औंढा नगरपंचायत चा पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलाचा ₹६४५ लक्ष रुपयांचा निधी वितरित.कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील औंढा नागनाथ नगरपंचायत येथे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 644 घरांना मंजुरी मिळाली होती.

या मंजूर झालेल्या घराच्या बांधकामासाठी पहिला हप्ता व दुसरा हप्ता निधी वितरित करण्यात यावा अशी मागणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना मागील आठवड्यात कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोषराव बांगर साहेब यांनी केली होती.

यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड साहेब यांनी लवकरात लवकर निधी वितरित करू असा शब्द आमदार संतोष बांगर साहेब यांना दिला होता आठवडाभरातच त्यांनी निधी वितरीत करून आपल्या शब्द पूर्ण केला.

 

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED