भाजपा अनुसूचित जाती घनसावंगी तालुका सरचिटणीस पदी लखन शरणांगत यांची नियुक्ती

61

✒️अतुल उनवणे(जालना,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9881292081

जालना(दि.26सप्टेंबर):-मंगरुळ ता.घनासावंगी जिल्हा जालना येथील माजी आमदार विलास बापु खरात यांचे खंदे समर्थक युवा कार्यकर्ते लखन बबनराव शरणांगत यांची घनासावंगी तालुका भाजपच्या अनुसुचित जाती सरचिटणीसपदी निवड करण्यात आली.या निवडीबद्दल लखन शरणांगत यांचे मंगरूळ ग्रामस्थांच्यावतीने व सर्व क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन व शुभेच्छा देण्यात येत आहेत.

शरणांगत यांची ही निवड केंद्रीय राज्यमंत्री ना.रावसाहेब दानवे, भाजपा जिल्हाध्यक्ष आ.संतोष दानवे, माजी आमदार विलासराव बापु खरात यांच्या मार्गदर्शनाखाली घनासावंगी भाजपा तालुकाध्यक्ष श्री शिवाजीराव दादा बोबडे यांनी नियुक्तीपत्र देत केली.

सदरील निवडीबद्दल पुरोगामी संदेश न्यूज नेटवर्कच्या प्रतिनिधीने नवनिर्वाचित पदाधिकारी लखन शरणांगत यांच्याशी संपर्क साधून प्रतिक्रिया जाणून घेतली.त्यावेळी त्यांनी सागितले की.लोकशाही भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे व भाजपाचे विचार तळागाळातील सर्वसामान्यापर्यंत पोहचण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच भाजपाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ जास्तीत जास्त सर्वसामान्यांना कसा होईल याकडे लक्ष देण्यात येईल असंही शरणांगत यांनी सांगितले.

तसेच घनासावंगी मतदार संघात भारतीय जनता पार्टीचे संघटन मजबूत करून पंतप्रधान नरेंद मोदी व मतदार संघातील भाजपाचे जेष्ठ नेते माजी आ विलासराव बापु खरात यांचे हात बळकट करण्यास संपूर्ण ताकत लाऊन प्रयत्न करणार असल्याचे लखन शरणांगत यांनी प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.