कोरपना नगरपंचायत बांधकाम ठेकेदार विरोधात नगरसेवकांची पोलिसात तक्रार

10

🔹ठेकेदाराची मनमानी कारभाराबाबत खमंग चर्चा

✒️संतोष मडावी(कोरपना,विशेष प्रतिनिधि)मो:-8698639446

कोरपना(दि.26सप्टेंबर):- नगरपंचायत वैशिष्टपूर्ण निधी सन 2017 18 मध्ये तत्कालीन आमदार संजय धोटे व पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून तीन कोटीचा निधी पंचायतीला उपलब्ध झाला प्रथम ही कामे शासनाने नगरपंचायत कडे वर्ग केले मात्र तांत्रिक मनुष्यबळाअभावी शासना ने शुद्धीपत्र काढून नव्याने वैशिष्टपूर्ण विकासाची कामे सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार कामाचे आराखडे अंदाजपत्रक तयार करून तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेसाठी तयार करण्यात आले होते.

नगरपंचायतीने स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने निविदा घेण्याचे शासनाचे निर्देश आहे मात्र कोरपणा येथील नगरपंचायतीने अंदाजपत्रकीय दरात एकाच ठेकेदाराला कोट्या अवधी रुपयाचे कामे एकाच ठेकेदाराकडून करण्यामागे पदाधिकाऱ्यांचे ही त जोपासण्याचे कार्य केल्यामुळे गावामध्ये उलट सुलट चर्चेला ऊत आले मात्र ठेकेदार भूषण ईटणकर यांनी या प्रकरणात रिट पिटीशन मा उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर येथे क्र 2233/ २०१९ ला रिट दाखल केली व नगरपंचायतीच्या दिनांक 7 मार्च 2019 च्या कार्य देश पत्र क्रमांक ४४९५ ला आवाहन दिले सन 2017 18 पासून देना कामासाठी उपलब्ध झालेला 1.39 कोटीचे कामे न्यायालय आदेश प्रतीक्षेत असताना कोरपना नगरपंचायतीचे सिमेंट काँक्रेट रस्ते नाली बांधकामे पण 2019 20 जून जुलै ऑगस्ट महिन्यात पूर्ण करण्याचा सपाटा लावून न्यायालयाच्या निर्देशांची अवहेलना व मुख्याधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवीत लेआउट तांत्रिक मार्गदर्शन प्रशासनिक आदेश न घेता स्वतःच्या मर्जीने आम्ही उर क विण्याची घाई का यामध्ये मोठा गैरव्यवहार व शासनाची दिशाभूल करण्याचा पूर्ण प्रयत्न ठेकेदाराने केला.

अंदाजपत्रकाच्या तरतुदीनुसार कामे झालेली नाही व शासनाच्या तांत्रिक मंजुरी प्रमाणे साहित्याचा वापर केलेला नाही रेती ऐवजी दगडी चुरी वापर करून निकृष्ट बांधकामे केली आहे काम करण्यापूर्वी कोणतीही तांत्रिक परवानगी घेतली नाही हे विशेष नगरपंचायत मुख्याधिकारी व शाखा अभियंता अनभिज्ञ कसे नगरसेवकांच्या तक्रारीच्या अनुषंगाने शाखा अभियंता भगत व लिपिक रवी मांजरे यांनी दिनांक सात नऊ 2020 रोजी नगर पंचायतक्षेत्रातील वार्ड क्रमांक 1 वार्ड क्रमांक तीन वार्ड क्रमांक चार क्रमांक 11 क्रमांक-8 पाहणी केली असता मुख्याधिकारीव प्रशासकीय आदेश नसताना काम केल्याचे उघड झाले.

मुख्याधिकारी यांनी ठेकेदार भूषण ईटणकर यांना तात्काळ विनापरवानगी सुरू असलेली कामे बंद करून दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश दिनांक 10 सप्टेंबर 2020 दिले ठेकेदार यांनी केलेली अनेक कामे निकृष्ट अंदाजपत्रकानुसार केली नसल्याने ठिकाणी नाल्या पडझड रस्ता उखडल्या चे चित्र दिसून येते यापूर्वी झालेल्या अनेक कामांमध्ये घोळअसून अंदाज पत्रकाप्रमाणे कामे झालीच नाही निकृष्ट बांधकाम प्रत्यक्ष मोजमाप यामध्ये फरक असून मोठ्या प्रमाणात मोजमाप फुगवून कामात तफावत असल्याने मोठा घोड करून वेगवेगळ्या निधीमध्ये हेराफेरी कौन्सिल सभेच्या ठरावानुसार अंमलबजावणी न झाल्यामुळे पंचायतीला शासकीय निधी गैरवापर आर्थिक नुकसानीचा फटका झाल्या ने पोलीस निरीक्षक कोरपना व जिल्हाधिकारी यांना नगरसेवक सुहेल आबिद अली यांनी तक्रार दाखल करूण चौकशी व झालेल्या गैर व्यवहार व निकृष्ठ कामा बाबत ठेकेदार यांचे वर गुन्हेदारवल करुण कार्यवाही ची मागणी केल्या ने नगरपचायत गोटात.खळबळ माजल्याने प्रशासन तो मी नव्हेच या भुमी केत दिसत आहे.