मारफळ्याच्या महिलेचा मृतदेह जातेगावात आढळला

8

✒️नवनाथ आडे(गेवराई,तालुका प्रतिनिधी)मो:-9075913114

गेवराई(दि.26सप्टेंबर):-तालुक्यातील भाटेपुरी येथील एका वय 40 वर्षीय महिलेचा मृतदेह जातेगाव नजीक सेलु कॉर्नरला आढळुन आला असुन सदरील महिला दोन दिवसापासून बेपत्ता असल्याचे बोलले जात आहे.

सविस्तर असे की, गेवराई तालुक्यातील मारफळा येथील एक 40 शर्षीय महीला दोन दिवसापासून बेपत्ता होती, घरचे व माहेरचे दोन्ही कुटुंब शोध घेत होते. दि. 26 / 9 / 2020 रोजी जातेगाव नजीक सेलु कॉर्नर भाऊसाहेब चव्हाण याच्या घराच्या बाजुला गोठ्यात सकाळी 6 च्या सुमारास तीचा मृत्यूदेह आढळुन आला आहे. महिला मारफळ्याची असल्याचे बोलले जात आहे.

या महिलेचा मृतदेह अवस्थेत सापडल्याने घातपात झाल्याची चर्चा गावकरी करत होते. महिलेला गळ्याला साङी बांधलेली होती व आंगाला जखमा असल्याचे दिसुन येत आहे.