🔺17 तास लागले मृतदेह शोधायला

✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दी.27सप्टेंबर):- ब्रम्हपुरी ला लागूनच असलेल्या दोंगेघाटावर देि. 26 सप्टेंबर शनिवारला दुपारी जवळपास साडेतीनला मित्रासोबत पोहण्यासाठी गेलेल्या एका शाळकरी मुलाचं पाण्यात बुडून मृत्यु झाला. आणि मृतक मुलाचं शोध घेत असता, जवळपास सोळा सतरा तासांनी मृत देह दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता सापडला.

मृतकाचे नाव राजकुमार कवळू सहारे (17) , रा. देऊळगाव त. आरमोरी जी. गडचिरोली येथील रहिवासी असून, मृतक अकरावी ला शिकत होता. मृतक पाच सहा दिवसापूर्वी देऊळगाव येथून ब्रम्हपुरी ला आपल्या आजीकडे मालताबाई श्रावण सहारे , यांच्याकडे पाहुणा म्हणून आला होता. शनिवारी दुपारी साडेतीन वाजता मित्रासोबत पोहत असताना खोल पाण्याचा अंदाज न आल्यामुळे , मुलाचा पाण्यात बुडून मृत्यु झाला.

आणि आज सकाळी 8 वाजता रविवारला मुलाचा मृतदेह सापडला, अश्याप्रकरे मृतकाच्या परिवारावर दुःखाचे डोंगर सावटले आहे. पुढील तपास ब्रम्हपुरी चे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पी. एस. आय. राजेश उंदिरवाडे करीत आहेत.

Breaking News, महाराष्ट्र, विदर्भ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED