ऊसतोड कामगार मुकादमांच्या प्रश्नांवर वंचित बहुजन आघाडी होणार आक्रमक

34

🔹ऊसतोड कामगार हा कामगार कायद्याच्या चौकटीत आलाच पाहिजे

✒️नवनाथ पौळ(प्रतिनिधी,केज तालुका)
मो:-8080942185

केज(दि.27सप्टेंबर):-आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली होऊ घातलेल्या ऊसतोड कामगार मुकादमांच्या मेळाव्याच्या पाश्र्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी पुर्व पश्चिम विभागातील कार्यकर्त्यांची वडवणी येथे बैठक संपन्न.

ऊसतोड कामगारांना प्रति टन चारशे रूपये भाव मिळून मुकादमांच्या खमिशनात दुप्पटिने वाढ करून वाहतुकदारांना वाहतूकीत वाढ झाली पाहिजे या प्रमुख मागणीसाठी ऊसतोड कामगार,मुकादमांचा बेमुदत संप.

 दि- २६ सप्टेंबर रोजी बीड जिल्ह्यातील वडवणी येथील ठाकरवाडा तांडा येथे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली होऊ घातलेल्या ऊसतोड कामगार मुकादमांच्या मेळाव्याच्या पाश्र्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी पुर्व पश्चिम विभागातील आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक वंचित बहुजन आघाडी बीड जिल्हाध्यक्ष अनिलभाऊ डोंगरे व प्रा.शिवराज बांगर सर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडली.
बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो एकूण महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांपैकी बीड जिल्ह्यातील सुमारे पंचावन्न ते साठ टक्के ऊसतोड कामगार हा बीड जिल्ह्यातील आहे.

या बैठकीत ऊसतोड कामगार मुकादमांच्या,वाहतुकदारांच्या विविध समस्या अडचणी,प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. आजपर्यंत ज्यांचे ज्यांचे साखर कारखाने ते साखर सम्राट तेच ऊसतोड कामगारांचे नेते झाले त्यांनी ढोंग रचून ऊसतोड कामगार मुकादमांच्या जिवावर राजकारण करण्यासाठी वर्षोंवर्ष मलिदा चाखुन एकतर्फी करार करून घेतले अन् ऊसतोड कामगारांना कोंडित पकडण्याचं काम इथल्या प्रस्थापित साखर सम्राटांनी केलं आहे. पण ह्या वेळी असं काही होणार नाही कारण की ऊसतोड कामगार मुकादमांचं,वाहतुकदारांचं नेतृत्व वंचितांचं स्वाभिमाणि अभ्यासू नेतृत्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब करणार आहेत त्यामुळे हा लढा आम्ही तीव्र करणारच व ऊसतोड कामगार, मुकादम यांना कामगार कायद्याच्या चौकटीत आणून ऊसतोड कामगारांना प्रति टन चारशे रूपये भाव जोपर्यंत मिळत नाही तो पर्यंत बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगार व संपूर्ण महाराष्ट्रातील ऊसतोड कामगार ऊसतोडीसाठी जाणार नाही व जाऊही देणार नाहीत असा एल्गार कार्यकर्त्यांनी यावेळी केला.

आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली होऊ घातलेला ऊसतोड कामगार,मुकादमांचा, वाहतूकदारांचा मेळावा भगवानगडाच्या पायथ्याशी लवकरच होणार आहे असाही पुर्नउच्चार मान्यवरांनी केला.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा महासचिव मिलिंदजी घाडगे, सचिनजी मेघडंबर, धम्मानंद साळवे,वंचित बहुजन आघाडी चे प्रसिद्धी प्रमुख सुशांतजी धावारे, डॉ.गणेश खेमाडे , संम्यक विद्यार्थी आंदोलन राज्य प्रवक्ते प्रशांतजी बोराडे, वंचित बहुजन आघाडी चे नेते भगवंत आप्पा वायबसे, वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाउपाध्यक्ष प्रसेनजीत रोडे, चरणराज वाघमारे,लखन जोगदंड, अंकुशजी जाधव, जांबुवंत उर्फ संजय तेलंग,अॅड सुभाष जाधव, बाबासाहेब मस्के, समाधान गायकवाड, संदिप फंदे, अशोकजी उजगरे,नितिन सरवदे, नवनाथ पौळ,विशाल धिरे, साहेबराव रोडे, खाॅजाभाई पठाण,नुकतेच वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केलेले डॉ.सोमवंशी, जेष्ठ साहित्यिक विद्याधर पांडे,अक्षय भूंबे यांच्यासह बीड जिल्ह्यातील जेष्ठ कार्यकर्ते यांच्या सह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी धनगर आरक्षण कृती समिती बीड यांच्या वतीने ऊसतोड कामगार मुकादमांच्या भाववाढीच्या संपास जाहीर पाठींबा देण्यात आला.
सदरील कार्यक्रमाचे आयोजन वंचित बहुजन आघाडी वडवणीचे चरणराज वाघमारे सर यांनी केले होते तर सुत्रसंचालन विनोदभैय्या काकडे या़नी केले.तर कार्यक्रमास जिम्मेदारी पोटी उपस्थित राहिलेल्या तमाम कार्यकर्त्यांचे आभार वडवणी टीमच्या वतीने मानले.