स्वतंत्र समता शिक्षक संघाच्या विदर्भ प्रदेश विभागीय अध्यक्षपदी राजकुमार गेडाम यांची नियुक्ती

6

✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.27सप्टेंबर):-उपनिबंधक श्रमिक संघ महाराष्ट्र राज्य नागपुर अंतर्गत श्रमिक संघ नोंदणी प्रमाणपत्रानुसार स्वतंत्र समता शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष सुनील तेलतुंबडे यांनी चिमूर तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खांबाडाचे भाषा विषय शिक्षक राजकुमार हरि गेडाम यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन विदर्भ प्रदेश विभागीय अध्यक्ष पदावर निवड केली आहे.

स्वतंत्र मजदूर युनियन ही स्वलग्न ट्रेड युनियन असून ही २२ राज्यात विस्थापित झालेली आहे. या युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. एस. पाटील (नागपुर) तर सरचिटणीस डॉ. ए. व्ही. किरण (आंध्रप्रदेश) ह्या आहेत. राजकुमार गेडाम यांनी शैक्षणिक व सामाजिक कार्यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थांना मार्गदर्शन, विज्ञान प्रदर्शनीत पाण्यावरील तराजू प्रयोग सादर, साहस शिबिरात सहभाग, नवरत्न स्पर्धेत सहभाग, अनाथ मुलीना दत्तक घेतले, वाचनालयाची स्थापना केली आदीसह विविध उपक्रमात सहभागी होऊन विद्यार्थांना मार्गदर्शन केले.

त्यांच्या निवडीबद्दल रत्नाकर लांडगे, सूर्यकांत जोगदंड, डॉ. सुधाकर मडावी, अजित साव, प्रशांत काटकर, रवी पोथारे, विनेश शेवाने, प्रल्हाद बोरकर, महेंद्र लोखंडे, दिलीप वटे, घनश्याम दंडारे, गुणवंत गेडाम, गौतम वावरे, प्रकाश तांबे, आनंद गजभिये, मनोज पाटील, जयेंद्र राऊत, गजानन थूल, भगवंत पोपटे, राजेंद्र गेडाम, विनोद गेडाम, आनंद पाटील, राजकुमार चुनारकर, हरि मेश्राम, नरेश पिल्लेवान, शेंद्रपाल शंभरकर, सुरेश डांगे, संदीप मेश्राम आदीने अभिनंदन केले आहे.