ब्रम्हपुरी शहरातील पुन्हा एक पत्रकार तथा शिक्षक , सामाजिक कार्यकर्ता हरपला

20

🔹पत्रकार परमानंद नंदेश्वर यांचे निधन

✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.27सप्टेंबर):- आज सायंकाळी सात वाजता सरकारी दवाखान्यात नीमोनिया या रोगाने श्री. परमानंद कवडूजी नंदेश्वर यांचा मृत्यू झाला. हे दवाखान्यात चार पाच दिवस भरती होते. व अचानक आज त्यांचा जवळपास 7 वाजता मृत्यू झाला. श्री. नंदेश्वर सर हे पेशाने नेवजबाई हितकारणी मध्ये सहाय्यक शिक्षक म्हणुन कार्यरत होते. तसेच दै. लोकशाही वार्ता चे पत्रकार होते, व महासत्ता डिजिटल न्यूज नेटवर्क चे ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी होते तथा सामाजिक कार्यकर्ता म्हणून हिरीने भाग घेत होते तसेच “द बुद्धिस्ट एम्प्लॉईज सोशल असोसिएशन ” चे अध्यक्ष होते.

अश्या प्रकारे एक व्यक्ती परंतु सर्व कामात निपून असलेला , एक चांगला नेतृत्व माणूस ब्रम्हपुरी ला सोडून निघून गेला आहे. आणि सर्व ब्रम्हपुरी वासियांना यांच्या जाण्याचा मोठा झटका बसलेला आहे. श्री. नंदेश्वर सरांच्या पाठीमागे त्यांची पत्नी , दोन मुले, व आई असा परिवार असून , त्यांचा परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळला आहे.