“बार्टी” समतादूताच्या वतीने बहुजनांच्या शिक्षणाचा महामेरु कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन

69

✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

नाशिक(दि.27सप्टेंबर):-डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या वतीने नाशिक जिल्हा समतादूत मार्फत कर्मवीर भाऊराव पाटील यांची 133वी जयंती ऑनलाईन पद्धतीने साजरी करण्यात आली.नाशिक जिल्हाचे समतादूत रुपाली आढाव यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.तसेच पेठे विद्यालयाचे आदर्श शिक्षक हर्षल कोठावदे यांनी शिक्षण क्षेत्रात कर्मवीर अण्णांनी केलेल्या बहुजनांसाठी त्यांनी केलेल्या कार्याची महिती उपस्थित समुदायाला देण्यात आली.

या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून रयत शिक्षण संस्थेचे प्राध्यापक श्री. संजय ठाणगे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समतादूत विशाल पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन समतादूत सविता उबाळे यांनी केले.
गेल्या चार महिन्यांपासून समतादूतांचे मानधन रखडले असताना सुद्धा अश्या बिकट परिस्थितीत उपासमारीची वेळ आली असताना सुध्दा आपल्या कुटुंबाची जबाबदारी आणि सामाजिक विकासाची जबाबदारी अश्या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडत आपले समाज प्रबोधनाचे कार्य समतादूता मार्फत अविरत सुरूच आहे.

आणि संपूर्ण समाज जातीमुक्त आणि विषामतमुक्त होईपर्यंत समतादूत यांचे कार्य हे अविरत सुरू राहणारच अशी विशाल पाटील माहिती यांनी दिली.या कार्यक्रमासाठी नाशिक जिल्हा प्रकल्प अधिकारी प्रतिज्ञा दाभाडे, मुख्य प्रकल्प संचालक प्रज्ञा वाघमारे व बार्टीचे महासंचालक श्री. धम्मज्योती गजभिये यांचे मार्गदर्शन लाभले.