28 सष्टेबर आंतरराष्टीय माहिती अधिकार दिवस

17

माहिती अधिकाराचे जनक पदमभुषण मा. अण्णा हजारे यांच्या अथक परिश्रमातुन हा कायदा लागु झाला माहितीचा अधिकार हा अधिनियम सर्वासाठी लागु झाला एखादया व्यक्तीला आपल्या वरील अन्यायाचे परिमार्जन करुन घेण्याचा सरळ मार्ग उपलब्ध नव्हता सरकारी कर्मचारी वअधिकारी गोपनियेतेच्या नांवाखाली सरकारी कागदपञे पाहण्याचा अधिकार नव्हता . जनता या देशाची मालक आहे सरकारी कर्मचारी नोकर आहे माञ मालकाला नोकराला हिशोब मागण्याचा अधिकार नव्हता या कायदयाने तो अधिकार सामान्य माणसाला मिळाला . माहितीचा अधिकार अधिनियमाचा मूलभूत उद्देश म्हणजे नागरिकांना अधिकार देणे शासनाच्या कामांमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निर्माण करणे भ्रष्टाचार कमी करणे आणि खऱ्या अर्थाने आपली लोकशाही व्यवस्था लोकांसाठी राबविणे हे आहे.

शासनाच्या कामकाजाविषयी नागरिकांना माहिती देण्यात हा अधिनियम म्हणजे एक मोठे पावले आहे. जी माहिती सार्वजनिक प्राधिकरणाने धारण केली असेल किंवा जी माहिती त्यांच्या नियंत्रणात असेल अशी माहिती सार्वजनिक प्राधिकरणाकडून मागण्याचा नागरिकांना अधिकार आहे.या अधिकारात कामाचे , दस्तऐवजांचे ,अभिलेखांचे निरीक्षण करण्याचा , दस्तऐवजांच्या किंवा अभिलेखांच्या टिपण्या उतारे , किंवा प्रमाणित प्रती घेण्याचा , आणि सार्वजनिक प्राधिकरणाने धारण केलेल्या किंवा सार्वजनिक प्राधिकरणाच्या नियंत्रणात असलेल्या साहित्याचे प्रमाणित नमुने घेण्याचा समावेश होतो . जी माहिती आधीच अस्तित्वात आहे आणि ,जी सार्वजनिक प्राधिकरणाने धारण केलेली आहे किंवा जी सार्वजनिक प्राधिकरणाच्या नियंत्रणात आहे अशीच माहिती केवळ या अधिनियमान्वये पुरविण्यात येईल याची नोंद घेणे महत्त्वाचे आहे . शासकीय माहिती अधिकाऱ्यास माहिती निर्माण करण्याची किंवा माहितीचा अन्वयार्थ देण्याची किंवा अर्जदाराने उपस्थित केलेले प्रश्न सोडविण्याची व प्रश्नांची उत्तरे देण्याची परवानगी नाही.

प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामात पारदर्शीपणा व उत्तरदायित्व निर्माण करणे आणि भ्रष्टाचारा स अटकाव करणे हा या अधिनियमाचा उद्देश आहे. माहितीचा अधिकार हा भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 19 च्या खंड. (१) ( अ) मध्ये समाविष्ट केलेल्या भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क यामधील हक्कांमध्ये मोडतो . व तो एक मूलभूत हक्क आहे .यात शंकाच नाही .माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्या कलम 3 मध्ये नमूद केल्याप्रमाणे या अधिनियमाच्या तरतुदींना अधीन राहून सर्व नागरिकांना माहिती मिळविण्याचा अधिकार आहे . कलम ६(१) मध्ये माहिती मिळविण्यासाठी कोण हकदार आहेत ते नमूद केलेले आहे. कलम ६(१) द्वारे प्रत्येक व्यक्ती कोणतीही माहिती मिळविण्यासाठी अर्ज करण्यास हकदार आहे .शासकीय निर्णय व त्याप्रमाणे झालेली कारवाई यासंबंधी माहिती मिळविण्याचा नागरिकांना हक्क आहे . हा हक्क मूलभूत हक्क असून तो नागरिकांच्या भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्कांमध्ये अंतर्भूत आहे …. तसेच कलम ८ च्या परंतुकात नमूद केल्याप्रमाणे जी माहिती संसदेला व राज्य विधान मंडळा स नाकारता येऊ शकत नाही ती माहिती कोणत्याही नागरिकास देता येऊ शकते.तसेच शासनाच्या अभिलेखा मध्ये उपलब्ध असलेली माहिती कागदपत्रांच्या प्रती च्या स्वरूपात पुरविणे अपेक्षित आहे.

मुद्द्यांवरील मते , कोणती कार्यवाही केली जाईल , इत्यादींचा समावेश माहितीच्या व्याख्येत होणार नाही .व अशी माहिती देता येणार नाही . असे यापूर्वीच दिनांक 05/08/2004 च्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आलेले आहे .तसेच काही प्रकरणी माहिती पुरविण्यासाठी वरिष्ठांचे आदेश घेऊन निर्णय घ्यावा लागतो व त्यास 30 दिवसांपेक्षा अधिक कालावधी लागतो अशी माहिती या कायद्याखाली पुरविणे अपेक्षित नाही…..शासन व्यवहारात पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने सदर कायदा करण्यात आलेला आहे. शासकीय कार्यालयातून इतर सर्वसाधारण मार्गाने लोकांना माहिती उपलब्ध होत नसल्यामुळे सदर कायदा करण्यात आलेला आहे.. तोंडी स्वरूपात किंवा इतर सर्वसाधारण मार्गाने अर्जदारास माहिती देण्यास सदर कायद्या त कोणताही प्रतिबंध नाही…… माहितीच्या अधिकार अधिनियमाचा उद्देश प्रत्येक भारतीय नागरिकास माहितीचे स्वातंत्र्य बहाल करणे हे आहे .मूलभूत हककाच्या संरक्षण व संवर्धनासाठी भारतीय संविधानात तरतूद आहे, पण कायदा नाही . म्हणून नागरिकांना मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कायदा हवा होता…

विद्यमान माहितीचा अधिकार कायदा त्याअनुषंगाने अस्तित्वात आलेला आहे .प्रत्येक नागरिकाला आपल्या मूलभूत हक्कांच स्वातंत्र्य अबाधित राहव यासा टी माहितीचा अधिकार आहे..हा अधिकार घटनेसोबतच जन्माला आला . पण नागरिक अंधारात चाचपडत होते.. संघर्षाच बळ मिळत नव्हतं ..या अधिकारांन ते बळ प्राप्त झालं आहे .आणि हा लाभ फार बहुमोल आहे… म्हणुन माहिती अधिकार दिनानिमित्य सर्वाना शुभेच्छा व चला भारत भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी आपण पण माहिती अधिकाराचा वापर करुया ….

✒️लेखक:-अंबादास पवार,माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ बुलढाणा जिल्हा अध्यक्ष
मो:-9561905573