✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

नाशिक(दि.28सप्टेंबर):-तालूक्यातील देवरगाव या छोट्या खेडेगावात धोंडू पालवे यांना तीन मुल व एक मूलगी असा परीवार .बापू बाबा हे शेवटच पूत्ररत्न शके १८५३ मध्ये आषाढी एकादशीला जन्माला आले.शाळेत २ री पर्यंत शिक्षणाचे धडे गिरवत असतानाच गायी चारण्यासाठी शाळा सोडावी लागली.पण त्याच कालावधीत श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर कडे संत निवृतिनाथाच्या महिना वारीला जाणा-या वारक-याचा समूदाय पाहून बांबाचीही त्र्यंबकेश्वरकडे ओढ निर्माण झाली.

बाबा वारीला गेले .वय १०ते १२ वर्षाचे असेल,पूढे बाबांचा वारीचा नेम सुरु झाला आणि नित्तनेम वारी करणारे वारकरी ह.भ.प.भागवत बाबा (चिकणी)यांचेकडून तूळशीमाळ घातली .बाबांची वारी सुरू झाली.त्याच बरोबर गायी चारत असताना शाळेत गिरवलेल्या धड्याची अडखळत अंभग ,हरीपाठ इ .वाचन सूरू झाले.वाचनाचा बाबांना छंद जडला ,ग्रंथाचे वाचन ज्ञानेश्वरी,तुकाराम गाथा ,भागवदगिता,भागवत इत्यादी अनेक ग्रंथाचे वाचन ,पांठातर बाबांचे अचूक होऊ लागले .गायी,म्हशी चारत असतांना बाबा नदीच्या कोरड्या भागात शेरी वनस्पतीच्या सावलीत वाचनाचा व साधनेचा अभ्यास होऊ लागला.

गावातील मंडळीलाही भजनाचा ,वारीचा छंद लागला .प्रवचन,किर्तनाची सुरवात झाली बाबांबरोबर गावातील परीसरतील मंडळी किर्तनाला साथ देऊ लागली .३० ते ४० किलोमिटर पंर्यत पायी चालत जाऊन खेडोपाडी किर्तन सेवा करत असतांना व्यसनमूक्तीचे,सदाचाराचे ,संस्काराचे दया ,परोपकार याची शिकवण देऊन परमार्थाच
[28/09, 9:04 am] आण्णासाहेब यशवंत आहेर: परमार्थिक पाया रचला व गावा गावात सप्ताह ,पारायणे सुरु केली परमार्थ कसा करावा हे बाबाकडून शिकावा निष्काम सेवा अव्याहत पणे करत आयूष्य सन्मार्गी लावला.चिंतन,मनन,वाचन करीत राहीले अंतकाळ समीप आला याची चाहूल लागल्यावर श्री गणेश प्रतिमेचे पूजन ,ज्ञाननेश्वरीचा सातवा अध्याचे वाचन करायला सांगून बाबांनी प्रतिमेजवळ तूळशिपत्र ठेवले एक ज्ञानेश्वरीवर ठेवले व एक तुळशिपत्र स्वताच्या तोंडात घेऊन या ईहलोकाचा निरोप घेतला.

या प्रसंगी श्री ह. भ.प अन्ना महाराज आहेर वारकरी महामंडळ नाशिक जिल्हाध्यक्ष ,श्री पंडीत गुरूजी हिंदूधर्मरक्षक महाराष्टृ अध्यक्ष,मा श्री हिरामणजी खोसकर आमदार,श्री कैलास बेंडकोळी प स सदस्य नाशिक,देवीदास जाधव,काशीनाथ बाबा खोरीपाडा,चंदर महाराज खरवळ ,सिताराम महाराज गणेशगाव,कसबे ,इत्यादी हजारो वारकरी पंचक्रोशीतील जनसागर ऊपस्थीत होता. 

महाराष्ट्र

©️ALL RIGHT RESERVED