🔺कोरपना नगराध्यक्षांना घेराव

✒️संतोष मडावी(कोरपना प्रतिनिधि)मो:-8698639446

कोरपना(दि.28सप्टेंबर):-मुस्लिम आरक्षण निर्णायक आंदोलन समिती कोरपना च्या वतीने कोरपना येथील नगराध्यक्ष कांताबाई भगत यांना मुस्लिम समाजाच्या वतीने माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यासाठी देण्यात आले राज्यभर हे आंदोलन सुरु असून खासदार आमदार लोकप्रतिनिधी यांच्या मार्फतीने मुस्लिम समाजाचा आर्थिक शैक्षणिक मागासलेपण यामुळे संपूर्ण राज्यभर मुस्लिम समाजाचे अत्यंत शैक्षणिक क्षेत्रात पीछेहाट झाल्याचे अनेक शासनामार्फत न्यायमूर्ती सच्चर आयोग डॉक्टर महमूद रहमान समिती यांनी शासनाला अहवाल सादर करून मुस्लिम अल्पसंख्यांक समाजाचा मागासलेपण व आर्थिक शैक्षणिक क्षेत्रात झालेल्या पिछाडी चे सविस्तर अहवाल शासनाससादर करून उपाय योजना सुचविल्या व न्यायालयाने देखील समाजाला शैक्षणिक प्रवाहामध्ये सहभागी करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

)मात्र राज्यकर्त्यांच्या शासनाच्या दुर्लक्षामुळे हा समाज सर्व क्षेत्रात पिछाडी वर गेला आहे मुस्लिम समाजाला विकासाच्या प्रवाहामध्ये सहभागी करून घेण्यासाठी शैक्षणिक आर्थिक नोकरीमध्ये देण्यात यावी मागणीसाठी आबिद अली यांच्या नेतृत्वात नदीम शेख मोहब्बत खान शहाबाज अली मसूद पटेल नादिरकादरी जब्बार शेख मोबीन रफिक शेख समीर शेख अब्दुल रशीदमज्जित समशेर यांनी घेराव करून निवेदन दिले अध्यक्ष कांताभगत यांनी शिफारशी सह मामुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येईल यासाठी आमचे समर्थन असल्याचे सांगितले.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED