उपजिल्हा कुटीर रुग्णालयात असुविधा उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर

31

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.28सप्टेंबर):-उपजिल्हा कुटीर रूग्णालय येथे अव्यवस्था व स्त्रि रोग तज्ञ व सोनेग्राफी सेंटर चालू नसल्यामुळे रुग्णांना असुविधा होत असल्या बाबत आज उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाइत यांना निवेदन देण्यात आले.हिंगणघाट येथील रुग्णांना होत असलेल्या असुविधेबाबत वत्रासाबाबत निवेदनात लक्ष वेधण्यात आले असून वर्धा जिल्हयातील हिंगणघाट हे मोठं औद्योगिक शहर तालूका आहे.

हिंगणघाट शहराच्या जनसंख्येनुसार ज्या सुविधा शासकीय रुष्णालयात असायला पाहिजे त्या नसून साधे स्त्रीरोग तज्ञ व सोनोग्राफी तज्ञ उपलब्ध नसल्यामुळे तालुक्यातील गोरगरीब
महिला रुग्णांची गैरसोय होत असून त्यामुळे त्यांच्या आरोग्याला गंभिर हानी होत आहे. काही दिवसांपूर्वीच हिंगणघाट शासकीय णालयात स्त्रीरोग तज्ञ नसल्यामुळे डिलेव्हरी रुग्णाला वर्धा येथे पाठविण्यात आले होते.

वर्धेला नेतांनाच त्या महिलेची वाहनामध्ये प्रसूती झाली. तसेच सदरच्या रुग्णालयात बरेचश्या अववस्था निर्माण झाले असून हिंगणघाटच्या शासकीय रुग्णालयाच्या हजेरीपटावर असलेले जे दोन डॉक्टर आहेत ते बरेच वर्षापासून डॉ. नार्लावार हे पूलगावला तसेच डॉ.गजेन्द्र कपूर हे वर्धेला कार्यरत असून त्यांना तत्काळ हिंगणघाट येथे पाठविण्यात यावे तसेच हिंगणघाटला १२० बेडचे हॉस्पीटल असून त्यात फक्त ५ व्हेंटीलेटरथी सोय उपलब्ध आहे.

त्यांपैकी एक सेवाग्राम हॉस्पिटलला देण्यात आले आहे तरी हिंगणघाट तालूक्याची जनसंख्या लक्षात घेता,शासकीय रुग्णालयाला जास्तीत जास्त व्हेंटीलेटर उपलब्ध करून देण्यात यावे तसेच शासकीय रूग्णालयामधील सोनोग्राफी मशीन मध्ये जन्मजात व्यंधत्व निदानाची सुद्धा सोय नाही,याकडे संबंधितांनी लक्ष देऊन बालरोग,स्त्रीरोग,फिजिशियन तसेच शल्यचिकित्सक यांची तात्काळ नियुक्ती करण्याची करुन जनतेची सोय करावी,अशी मागणी तालुका काँग्रेस कमीटीचेवतीने ज्वलंत मून शहर कांग्रेस कमेटी चे अध्यक्ष पडंरीनाथ कापसे यांनी केली आहे.