

🔸शाखा व्यवस्थापक काळे यांनी लेखी दिल्यानंतर अमर उपोषण सुटले
✒️ देवराज कोळे(गेवराई प्रतिनिधी)मो:-8432409595
गेवराई(दि.28सप्टेंबर):-तालुक्यातील तलवाडा येथील शेतकरी खरीप पिकापासून वंचित आहे त्यामुळे शेतकरी त्यांच्याकडे पीककर्जासाठी चकरा मारत आहे काही शेतकरी स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचे दहा वर्षापासून कर्जदार आहेत त्यातील काही लोकांना शासकीय कर्जमाफी योजनेमधून कर्जमाफी झालेली आहे व काही शेतकरी नवीन करण्यासाठी मागणी करत आहे परंतु त्यांना कोणती बँक शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यास तयार नाही हे सर्व बागायतदार असून काही शेतकऱ्याकडे फळबाग आहे.
म्हणून शेतकऱ्यांच्या कर्ज साठी बँकेने कर्ज देण्यास संबंधित अधिकाऱ्यांना माजी जिल्हा परिषद सदस्य ॲङ सुरेश हस्ते साहेब व अन्य शेतकर्यानी महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा बीड व्यवस्थापक तसेच तहसीलदार साहेब यांना निवेदन दिनांक 15/9/2020 रोजी देण्यात आले होते.
त्यासाठी आज रोजी 28/9/2020 रोजी सोमवारी महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज देण्यात यावे अशी मागणी ॲङ सुरेश हात्ते, सह तलवाडा सर्कल मधील अनेक शेतकऱ्यांनी केली आहे, तलवाडा महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक काळे साहेब यांनी सांगितले की कर्जमाफी तले जुने खातेदारांचे काही फाईली राहिले आहे ते फाईली होताच नवीन कर्ज सुरळीत करण्यात येईल उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन दिल्यानंतर हा उपोषण सोडण्यात आले आहे.
या वेळी माजी सरपंच मुबीन खतीब,जातेगाव चे सामाजिक चळवळीचे युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण, पञकार देवराज कोळे, भाजपाचे तालुका अल्पसंख्या उपाध्यक्ष शेख मोहंमद, ॲङ सुरेश पवार, मोयोदिन इनामदार, दादा रोकडे, माजी सरपंच राधाकिशन शिंगणे, एजाज कुरेशी,, समी खतीब, सुनिल नाटकर , सतिश तौर ,भगवान तौर ,अदिक शेतकरी बांधव उपस्थित होते सोसल डिस्टन्स चा भान ठेवून हे उपोषण करण्यात आले आहे.