शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई व पीकविमा वाटप करा – सुनिल ठोसर

19

✒️नवनाथ आडे(गेवराई,विशेष प्रतिनिधी)मो:-9075913114

बीड(दि.28सप्टेंबर):- जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अतिवृष्टी पावसाने हजेरी लावली असून सर्व पिकांचे अतोनात नुकसान झालं हे अतिशय वाईट असून दुर्दैव आहे त्यात शेतकर्यांचे खूप प्रमाणात नुकसान झाले आहे. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी तर कधी महापूर अश्या निसर्गाच्या लहरीपणामुळे व कोरोना या आजाराने तर धुमाकूळ घातलाय शेतकरी हवालदिल झाला आहे.

या वर्षी शेतकऱ्यांनी शेतात कापूस, सोयाबीन, तुर, भुईमुंग, भाजीपाला हे पीके चांगली आली होती. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे ही सर्व पिके वायाला गेली असून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्याने सर्व पिकांची नासाडी झाली आहे शासनाने बीड जिल्हा अधिकारी पालकमंत्री सर्वांच्या आदेश असताना महसूल विभागाने चालवलेली पंचनामा चालढकल यावर एकही नेता पार्टी वरिष्ठ अधिकारी कारवाही केलेली दिसत नाही असा दावा अनेक शेतकरी रयत शेतकरी संघटनेच्या माध्यमातून विविध पदाधिकारी यांच्या कडे मागणी केली जात आहे तरी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत तसेच बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी.

नुकसान झालं अश्या सर्व शेतकरी बांधवांना पीकविमा रक्कम आठ दिवसाच्या आत बँक खात्यावर जमा करावे नसता विमा कंपनीचा एकही अधिकारी सापडेल तिथे रूमण्यान मारल्याशिवाय राहणार नाही विमा कंपनी आधीच बीड जिल्ह्यातील सर्वात शेवटी दिली अनेक अडचणीतून आम्ही विमा भरला? आमचे नुकसान झालं? यावर एकही अधिकारी नेता बोलायला तयार नाही? अनेक लोक वेगवेगळ्या सभागृह मध्ये सदस्य असून स्वतः स्वार्थी हेतूने जाहिरात बाजी करत आहे? हजारो कोटी रुपयांची माफी एका दिवसात होते आमचं कर्ज पाच,दहा,वीस, पंचवीस वर्षे पूर्ण झाले तरीही पाफ होत नाही.

पीकविमा भरला मग मंजूर कोण करणार असे अनेक प्रश्न उपस्थित होत असताना शेतकऱ्यांना मात्र निसर्गाने घात केला आहे असून राजकीय यंत्रणा ही मुळावर आल्यासारखी वागत असून येत्या आठ दिवसांत पीकविमा मंजूर करून खात्यावर पैसे द्या नसता बीड जिल्ह्यातील कुठल्याही ठिकाणी एकही अधिकारी, नेता, विमा कंपनीचा अधिकारी, कृषी विभागाच्या कुठलाही अधिकारी, कुठलाही सदस्य फिरू देणार नाही असा इशारा रयत शेतकरी संघटनेचे नेते बीड जिल्हा प्रमुख सुनील ठोसर पाटील तसेच सर्व पदाधिकारी यांच्या वतीने देण्यात आले आहे अतिवृष्टी व वारे यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात उभे असणारे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

ऊस भुईसपाट झाला आहे व कापसाचे बोंड सडायला सुरुवात झाली आहे. भुईमूग, भाजीपाला व अन्य अंतर्गत पिके पिवळी पडून सडू लागली आहेत. बाजरी जमीनदोस्त झाली आहे. अतिवृष्टीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तरी राज्य सरकारने तात्काळ बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व पीकविमा मंजूर करण्यात यावा व शासनाने हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत तत्काळ शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा करून शेतकरी वाचवावा असे आवाहन सुनील नानासाहेब ठोसर पाटील बीड जिल्हा प्रमुख रयत शेतकरी संघटना यांच्या वतीने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.