रेती व दारू तस्करी च्या मुद्द्यावर आम आदमी पार्टी ची गांधी जयंती ला उपोषणाची तयारी

37

🔹सी. आय. डी. चौकशीची मागणी. – तस्करी होत असलेल्या रेतीघाटावरच उपोषण करणार

✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.29सप्टेंबर):-मागील काही महिन्यांपासून चिमूर विधानसभेत भ्रष्टाचाराचा सुळसुळाट चाललेला आहे. उघळपणे होत असलेल्या रेती व दारू तस्करी मुळे जनतेचा प्रशासनावर विश्वास उरलेला नसून या भ्रष्टाचाराला राजकीय आशीर्वाद असल्याचे सगळीकडे बोलल्या जात आहे. एतिहासिक वारसा असलेला चिमूर विधानसभा क्षेत्र आता भ्रष्टाचाराचे ‘माहेरघर’ म्हणून ओळखल्या जात आहे.

कोरोना काळात संचार बंदीचा पुरेपूर फायदा घेत अनेक रेती तस्कर सक्रीय झालेले आहेत. उघळपणे होत असलेल्या रेती तस्करी मुळे व काही राजकीय पक्षाचे लोकच यामध्ये पकडल्या गेल्यामुळे जनतेच्या मनात अनेक प्रश्नचिन्ह उभे झाले आहे.

राजरोसपणे होत असलेल्या रेती व दारू तस्करीत राजकीय आशीर्वाद असल्याचे बोलल्या जात आहे. काही दिवसाआधी चिमूर विधानसभेत सागवान तस्करी चा प्रकार आढळून आला होता. या सर्व प्रकारात शासनाचे लक्ष वेधावे तसेच सी. आय. डी. चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांच्या नेतृत्वात चिमूर विधानसभेतील आम आदमी पार्टी चे सर्व पदाधिकारी व स्वयंसेवक येत्या २ ऑक्टोबर ला गांधी जयंती चे औचित्य साधून तस्करी होत असलेल्या रेतीघाटावर एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला बसणार आहेत.

यासंदर्भात उपविभागीय अधिकारी व पोलीस उपनिरीक्षक चिमूर यांना निवेदन देण्यात आले, या दरम्यान आप चे चंद्रपूर जिल्हा संघटक परमजित सिंग, आदित्य पिसे, मंगेश शेंडे, सुशांत इंदोरकर, विशाल इंदोरकर, विशाल बारस्कर, कैलाश भोयर व अनेक पदाधिकारी उपस्थित होते.